शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

चंदनापुरीचा अजिंक्य !

By admin | Updated: July 1, 2015 00:43 IST

सुवर्णक्षण : क्रिकेट क्षितिजावर झळकले नगरचे नाव

रियाज सय्यद - संगमनेर -झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा २३ वा नवोदित युवा कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणेचे नाव कोरले गेले. चंदनापुरीसारख्या छोट्याशा खेडेगावातून आलेल्या रहाणे कुटुंबासाठी हा ऐतिहासिक क्षण ठरला. त्यामुळे चंदनापुरी तसेच नगर जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकले आहे. नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर चंदनापुरीपासून पूर्वेला कच्चा मातीचा रस्ता जातो रहाणे यांच्या शेतातील जुन्या पडवीवजा कौलारू घराकडं. याच घरात अजिंक्यचे वडील मधुकर व त्यांचे मोठे भाऊ सीताराम आई-वडिलांसह राहत. मधुकर रहाणेंचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातच झाले. चंदनेश्वर विद्यालयात १९७८-७९ साली ते दहावीत पहिले आले. पुढे मुंबईला गेले. ६ जून १९८८ रोजी अजिंक्यचा जन्म आश्वी खुर्द येथे झाला. नावाप्रमाणे क्रिकेटमध्ये तो नेहमी ‘अजिंक्य’ ठरला. लहानपणी खेळाची आवड असल्याने दिवस-दिवसभर तो क्रिकेटच्या मैदानावर असायचा. ३ सप्टेंबर २०११ ला भारतीय क्रिकेट संघात अजिंक्यचा समावेश होताच चंदनापुरीत मोठा जल्लोष झाला होता. गावाने मिरवणूक काढून अजिंक्यचा सत्कार केला. रहाणे यांनी शेतातच ‘झेलू’ नावाचा छोटेखानी बंगला बांधला आहे. सण, उत्सव, समारंभ, यात्रेला रहाणे कुटुंब गावी येतं. गावी ‘अजिंक्य’ची आजी झेलूबाई व चुलते सीताराम रहाणे राहतात. झेलूबाई रहाणे (वय ८५) थकल्या आहेत, पण अजिंक्यबद्दल विचारताच ताडकन् उठून बसत आपल्या नातवाचे गोडवे गाऊ लागतात.२९ जून २०१५ चा सूर्य सुवर्णक्षण घेऊन आला. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी अजिंक्यची संघाच्या कर्णधारपदी निवड झाली अन् चंदनापुरीकरांच्या आनंदाला उधाण आले. फटाक्यांच्या आतषबाजीत पेढे वाटून गावकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. अजिंक्यचा आमाला लई आनंद झालाय. मी मूळबाईला गेले. पेढं वाटून आले. मंदिराच्या पेटीत पैसे टाकले. त्येला चांगलं ठेवं, असं देवाकडं मागितलं. - झेलूबाई रहाणे, आजी