शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

बालगोपाल फुटबॉल क्लबला विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे - डी. सी. नरके राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत अंतिम सामान्यात बालगोपाल फुटबॉल क्लबने पाडळी फुटबॉल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपार्डे - डी. सी. नरके राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत अंतिम सामान्यात बालगोपाल फुटबॉल क्लबने पाडळी फुटबॉल क्लबचा २ विरुद्ध ० गोलने पराभव करून विजेतेपद पटकावले. मा. आ. चंद्रदीप नरके यांच्याहस्ते विजेत्या बालगोपाल संघास २१ हजार रोख व चषक, तर उपविजेत्या पाडळी फुटबॉल क्लबला १५ हजार व चषक देण्यात आला. तिसऱ्या क्रमांकाच्या फुलेवाडी संघाला ११ हजार व चषक देण्यात आला, तर उत्तेजनार्थ सांगरुळ फुटबॉल क्लबला ७ हजार व चषक देण्यात आले.

कुंभी-कासारी कारखान्यावर नरके विद्यानिकेतनच्या मैदानावर झालेल्या बालगोपाल व पाडळी संघादरम्यान चुरशीने झालेल्या अंतिम सामन्यात पहिल्या हाफमध्ये पाडळीच्या योगेश कदम ,रोहन आडनाईक, तर बालगोपालच्या ऋषिकेश पाटील व अभिजित साळुंखे या खेळाडूंनी उत्तम चढाया करत गोल करण्याचे प्रयत्न केले. सामन्याच्या १२ व्या मिनिटाला मिळालेल्या पासवर बालगोपालच्या रोहित कुरणेने हेडने पहिला गोल नोंदवला. पाडळीला १५ व्या मिनिटावेळी मिळालेल्या कॉर्नरवर गोल करता आला नाही. बालगोपालच्या ऋतुराज पाटील याने १८ व्या मिनिटाला मैदानी गोल करत पाडळीवर २ विरुद्ध ० गोलने आघाडी घेतली.

दुसऱ्या हाफमध्ये ५ व ६ व्या मिनिटाला पाडळीच्या किरण कावणेकर याने सलग तीनवेळा मिळालेल्या संधीचे गोल करण्यात अपयश आले. शेवटी बालगोपालने हा सामना २ विरुद्ध ० गोलने जिंकला.

तत्पूर्वी तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात फुलेवाडी संघाने सांगरुळ फुटबॉल क्लबचा २ विरुद्ध ० गोलने पराभव केला. यावेळी संयोजक संभाजी नाळे, शिवाजी डुबल याचा कुंभी बँकेचे अध्यक्ष अजित नरके यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कुंभी कासारी संचालक दादासाहेब लाड, प्रकाश पाटील (आकुर्डे कर), संदीप शेलार, सुधीर खाडे, अजित पाटील उपस्थित होते

उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू ---

मॅन ऑफ द मॅच-ऋतुराज पाटील (बालगोपाल) बेस्ट डिफेन्स--आरबाज पेंढारी (फुलेवाडी)

बेस्ट फॉरवर्ड-योगेश कदम (हनुमान पाडळी बु।)

बेस्ट गोली--अक्षय कुरणे (बालगोपाल) बेस्ट हाफ-गणेश पाटील (सांगरुळ) मॅन ऑफ द सिरीज- ऋषिकेश मेथे पाटील (बालगोपाल)

१९डीसीनरके फुटबॉल (फोटो) डी सी. नरके राज्यस्तरिय फुटबॉल स्पर्धेत विजेत्या बालगोपाल फुटबॉल क्लबला विजेतेपदाची ट्रॉफी देताना चंद्रदीप नरके, अजित नरके, संभाजी नाळे, दादासाहेब लाड, प्रकाश पाटील.