शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीतील सायझिंग व्यवसायिकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 15:20 IST

Crime Ichlkaranji Kolhapur- इचलकरंजी येथील सायझिंगधारकाने शिरढोण - कुरूंदवाड (ता शिरोळ) येथील पुलावरून पंचगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. अशोक दत्तोबा मांगलेकर (वय 50, रा. पटेकरी गल्ली, जवाहरनगर) असे त्यांचे नाव आहे. आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याच्या चर्चेने शहरात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देइचलकरंजीतील सायझिंग व्यवसायिकाची आत्महत्याआर्थिक विवंचनेतून पंचगंगा नदीत उडी

इचलकरंजी : येथील सायझिंगधारकाने शिरढो - कुरूंदवाड (ता शिरोळ) येथील पुलावरून पंचगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. अशोक दत्तोबा मांगलेकर (वय 50, रा. पटेकरी गल्ली, जवाहरनगर) असे त्यांचे नाव आहे. आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याच्या चर्चेने शहरात खळबळ उडाली आहे.वस्त्रनगरीतील यंत्रमाग व्यवसायाला सद्या विविध समस्या भेडसावत आहेत. त्यातच लॉकडाऊनमुळे हा व्यवसाय पुरता घाईला आला आहे. त्यातून सावरत असताना सततच्या सुत दरवाढीमुळे यंत्रमागधारक बेजार झाला असून वीज बिल आणि कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात आहे.

यामुळे व्यवसाय कसा करायचा असा प्रश्‍न उद्योजकांना सतावतोय. येथील जवाहरनगर परिसरात राहणार्‍या अशोक मांगलेकर यांनी यंत्रमाग व्यवसातील नुकसानीमुळे यंत्रमाग विकुन सायझिंग व्यवसाय सुरू केला होता. त्यांनी या व्यवसायासाठी कर्ज काढले होते. व्यवसायातील तेजी-मंदीमुळे कर्जाची परतफेड होत नव्हती. मात्र कर्जासाठी वारंवार तगादा लावला जात असल्याने मांगलेकर हैराण झाले होते. त्यांनी शुक्रवारी (दि19) रोजी काही मित्रांना "मी आता चाललोय" असा फोनही केला होता.त्यानंतर शुक्रवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास शिरढोण येथील पुलावरुन पंचगंगा नदीपात्रात उडी मारुन आत्महत्या केली होती. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शनिवारी सकाळी वजीर रेस्क्यू फोर्सच्या पथकाला पाचारण करण्यात आले.

रौफ पटेल यांच्या पथकाने नदीपात्रातील मृतदेह शोधून काढला. कुरुंदवाड पोलिसांनी पंचनामा केला. त्यानंतर कुरुंदवाड येथील शासकीय रुग्णालयात मृतदेहाचे विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद कुरुंदवाड पोलिस ठाण्यात झाली आहे. त्यांच्यावर येथील पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले विविध यंत्रमागधारक संघटनांचे प्रतिनिधी व कारखानदार यांनी गर्दी केली होती. मांगलेकर यांच्या पश्‍चात पत्नी आणि विवाहीत मुलगा, मुलगी असा परिवार आहे.सुसाईडनोटमध्ये सहा जणांची नावे ?मांगलेकर यांच्याकडे मिळून आलेल्या चिठ्ठीतून आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचे स्पष्ट होत असून त्यामध्ये सराफ, व्यापारी व नातेवाईकासह 6 जणांचा उल्लेख असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. त्यामुळे संबंधितांच्यात खळबळ माजली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीichalkaranji-acइचलकरंजीkolhapurकोल्हापूर