शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

सभापती आवाडे गटाचा, उपसभापती महाडिक गटाचा

By admin | Updated: September 1, 2015 23:46 IST

वडगाव बाजार समिती : निवडी बिनविरोध होणार; सिंगतकरांवरील कारवाईमुळे ९ रोजी निवड कार्यक्रम

आयुब मुल्ला- खोची  -वडगाव शेती उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक सर्व गटांना सोबत घेऊन अगदी सोयीने आमदार महादेवराव महाडिक यांनी बिनविरोध केली. आता आज, बुधवारी होणारी सभापती, उपसभापती निवडही बिनविरोध करण्याचे संकेत दिले आहेत. ही दोन्ही पदे अनुक्रमे विलास खानविलकर (रेंदाळ) व बापूसो मोठे (पट्टणकोडोली) यांच्या रूपाने तालुक्याच्या दक्षिण विभागाला मिळणार आहेत. या संदर्भात मंगळवारी राजाराम कारखान्यावर संचालकांची मते आजमावण्यात आली. आवाडे गटाला सभापती पद व महाडिक गटाला उपसभापती पद निश्चित झाले आहे. समितीचे कार्यालय तालुक्याच्या पश्चिमेस आणि पदे मात्र दक्षिण विभागाला एकाचवेळी मिळण्याचा योगायोग साधला जाणार आहे. महाडिक समर्थक संचालक जास्त असताना आमदार महाडिक यांनी आगामी राजकारण डोळ््यासमोर ठेवून सावध पाऊल टाकले आहे.बाजार समिती ही तालुक्याच्या राजकारणाचे प्रमुख केंद्रबिंदू आहे. आमदार रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्यानंतर या समितीवर महाडिक यांनीच आपले वर्चस्व ठेवले आहे. गतवेळी चुरशीने निवडणूक झाली. त्यावेळी फक्त विरोधी गटाचे बाळासाहेब माने हे एकमेव विजयी झाले. त्यांनाही महाडिक यांनी आपले समर्थक बनविले आहे. विद्यमान राजकीय परिस्थिती पाहता सत्ताधारी गटाला विरोध होणे ही सोपी गोष्ट नव्हती. तरीसुद्धा दस्तुरखुद्द महाडिक यांनीच आवाडे, कोरे, माने, आवळे, यड्रावकर, हळवणकर गटाला सोबत घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार आवाडे गटाला सहा, कोरे गटाला दोन, माने, आवळे, हाळवणकर गटाला एक जागा देत निवडणूकच बिनविरोध केली. हे करताना जुन्या ज्येष्ठ संचालकांना महाडिकांनी वगळले. नव्या चेहऱ्यांना संधी दिली. इतर पक्षांचा विरोधही मावळला. त्यामुळे एकहाती सत्ता येण्याची स्थिती असताना महाडिक यांनी बेरजेचे राजकारण करीत विरोधकांना सहकार्याने गणित घातले आहे.स्वत:चे संचालक जास्त असताना आवाडे गटाला सभापती पद देण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांपूर्वी तसा निरोपही त्यांनी आपले विश्वासू कार्यकर्ते यांच्यामार्फत आवाडे यांना दिला. त्यानुसार माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी महाडिक यांची भेट घेऊन आभार मानले व अडीच वर्षे संधी द्यावी, अशी मागणी केली. परंतु, मंगळवारी झालेल्या बैठकीत एकच वर्षे संधी दिली जाईल ठरले. यामध्ये आवाडे समर्थक विलास खानविलकर व उपसभापतीसाठी बापूसो मोठे यांची नावे निश्चित करण्यात आली. उपसभापतीसाठी महाडिक गटातील नूतन संचालक बी. जी. बोराडे (चावरे) यांचेही नाव चर्चेत होते. वडगाव शेती उत्पन्न बाजार समितीची सभापती, उपसभापती निवडीचा कार्यक्रम आज, बुधवारी होणार होता. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून लाचप्रकरणात सापडलेले सिंगतकर हे होते. त्यामुळे आता या निवडी पुढील बुधवारी (दि.९) होणार आहेत. आजरा येथील उपनिबंधक पी. व्ही. पोवार निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.महाडिक यांनी आगामी विधान परिषद निवडणूक डोळ््यासमोर ठेवून राजकीय घडामोडी यशस्वी केल्या आहेत. विरोधकांना त्यांनी बरोबर घेतले आहे. महाडिक यांनीच निवडणूक बिनविरोध करण्याबरोबरच सभापती, उपसभापती पदांची नावे निश्चित केली आहेत.