उदयनराजे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:30 IST2021-02-25T04:30:45+5:302021-02-25T04:30:45+5:30

कोल्हापूर : श्रीमंत उदयनराजे भोसले प्रतिष्ठान (कोल्हापूर)तर्फे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस कोरोनाच्या पाश्वभूमीवर अत्यंत साधेपणाने व मोजक्या ...

Celebrate Udayan Raje's birthday with social activities | उदयनराजे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा

उदयनराजे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा

कोल्हापूर : श्रीमंत उदयनराजे भोसले प्रतिष्ठान (कोल्हापूर)तर्फे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस कोरोनाच्या पाश्वभूमीवर अत्यंत साधेपणाने व मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बुधवारी साजरा करण्यात आला. यानिमित्त दिवसभरात विविध उपक्रम राबविण्यात आले.

सकाळी कोल्हापूरच्या करवीरनिवासिनी अंबाबाई देवीस साकडे घालून उदयनराजे यांना दीर्घायुष्य लाभो व सर्वांची कोरोनापासून लवकर सुटका होऊ दे, अशी प्रार्थना करण्यात आली. पांजरपोळ संस्थेतील मूक जनावरांना चारा अर्पण करण्यात आला. पन्नासहून अधिक गरज कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे मयूर भोसले, शैलेश जाधव, सुहास भोसले, विश्वास गंगाधर, युवराज मोरे, पृथ्वीराज उनाळे, अमित भोसले, रंजन नलावडे, अश्विन जाधव, प्रसाद भोसले, अथर्व जाधव, मयूर काटे, आदी उपस्थित होते.

फोटो : २४०२२०२१-कोल-मयूर भोसले

ओळी : कोल्हापुरात खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत उदयनराजे भोसले प्रतिष्ठान (कोल्हापूर)तर्फे बुधवारी पांजरपोळ संस्थेत गाईंना चारा दिला.

Web Title: Celebrate Udayan Raje's birthday with social activities