शनि जयंती साधेपणाने साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:17 IST2021-06-11T04:17:07+5:302021-06-11T04:17:07+5:30

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी अंबाबाई मंदिर परिसरातील शनि मंदिरात शनि जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. यावेळी जगाला कोरोनापासून ...

Celebrate Shani Jayanti simply | शनि जयंती साधेपणाने साजरी

शनि जयंती साधेपणाने साजरी

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी अंबाबाई मंदिर परिसरातील शनि मंदिरात शनि जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. यावेळी जगाला कोरोनापासून मुक्ती मिळावी, अशी प्रार्थना करण्यात आली.

वैशाख अमावास्येला शनि जयंती साजरी होते. यानिमित्त पहाटेपासूनच देवाला रूद्र, महिम्न, सौर, पवमान, पुरुषसुक्त मंत्रोच्चारात पंचामृत आणि तैलाभिषेक करण्यात आले. सायंकाळी शनि जन्मावर प्रवचन झाले व साडेसहा वाजता मोजक्या लोकांच्या उपस्थितीत जन्मकाळ सोहळा झाला. त्यानंतर आरती, मंत्रपुष्प होऊन सुंठवड्याचे वाटप करण्यात आले. चंद्रकांत झुरळे व अनिरुद्ध झुरळे यांनी स्वप्निल जोशी यांच्या पौरोहित्याखाली सर्व धार्मिक विधी पार पाडले. यावेळी जगाला कोरोनापासून मुक्ती मिळावी,यासाठी प्रार्थना करण्यात आली.

--

फोटो नं १००६२०२१-कोल-शनी जयंती

ओळ : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर आवारातील शनि मंदिरात गुरुवारी शनि जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली.

--

Web Title: Celebrate Shani Jayanti simply