शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लजमध्ये तलाठी लाच घेताना जाळ्यात

By admin | Updated: December 19, 2014 23:23 IST

सात-बारासाठी चार हजारांची लाच

गडहिंग्लज : खरेदी केलेल्या जमिनीच्या सात-बारावर नाव नोंदविण्यासाठी चार हजारांची लाच स्वीकारताना गडहिंग्लज सज्जाचा तलाठी बाळकृष्ण भीमराव मगदूम (वय ५२, रा. गुजर वसाहत, कडगाव रोड गडहिंग्लज, मूळ गाव-पिंपळगाव, ता. भुदरगड) याला रंगेहात पकडले. येथील तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयात सकाळी दहाच्या सुमारास कोल्हापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक उदय आफळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.अविनाश ताशिलदार (रा. शेंद्री रोड, गडहिंग्लज) यांनी रणजित पोवार यांची गडहिंग्लज हद्दीतील पाच गुंठे जमीन खरेदी केली. त्यांनीे स्वत:चे नावे सात-बारा उतारा मिळण्यासाठी १ डिसेंबर रोजी रितसर अर्ज केला. नंतर १६ डिसेंबर रोजी ताशिलदार यांनी तलाठी मगदूम यांची भेट घेतली असता मगदूम याने याकामी सात हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत ताशिलदार यांनी तक्रार दाखल केली होती. तडजोडीनंतर चार हजार रुपयांची लाच ताशिलदार यांच्याकडून स्वीकारताना मगदूम याला त्यांच्या कार्यालयात पथकाने रंगेहात पकडले. ‘आॅलराऊंडर’तहसीलदार आणि प्रांत कार्यालयाकडील कोणताही कार्यक्रम, उपक्रम असो ‘मगदूम रावसाहेबा’शिवाय कुणाचेच पान हालायचे नाही. बहुतांशी ‘आॅफिशियल’ आणि ‘अनआॅफिशियल’ बिले मगदूम रावसाहेबच पास करायचे. अनेक जबाबदाऱ्या पार पाडण्यातून त्यांची ‘आॅल राऊंडर’ अशी एक वेगळी प्रतिमा बनली होती. त्याचाच ‘ओव्हरकॉन्फिडन्स’ नडल्याची चर्चा सर्वत्र होती.मोठे व्यवहारजिल्ह्याचा उपविभाग म्हणून वेगाने विस्तारणाऱ्या गडहिंग्लजमधील जागांचे भावही गगनाला भिडले आहेत. दिवसाकाठी होणारे अनेक मोठे खरेदी-विक्रीचे व्यवहार ‘तलाठी सज्जा’ शिवाय केवळ अशक्य. सुमारे चार वर्षांपासून हा सज्जा मगदूम सांभाळत होते. त्यांची ‘मागणी’ दिवसेंदिवस वाढत गेल्यानेच ही वेळ आल्याची चर्चा सुरू होती.