शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

आवाजाचे उल्लंघन केले; कोल्हापूर परिक्षेत्रातील किती मंडळांवर दाखल झाले खटले, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 19:14 IST

१७ हजार सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

कोल्हापूर : गणेशोत्सव काळात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करून ध्वनियंत्रणांचा आवाज वाढवणाऱ्या कोल्हापूर परिक्षेत्रातील ७१६ मंडळांवर खटले दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे. विसर्जन मिरवणुकीतही मंडळांच्या आवाजावर पोलिसांचे लक्ष राहणार आहे. तसेच उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिक्षेत्रातील १७ हजार सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या कारवाया आणि खबरदारीच्या उपायांबद्दल फुलारी म्हणाले, ‘राज्यातील एकूण गणेश मंडळांपैकी सुमारे ३० ते ३५ टक्के मंडळे कोल्हापूर परिक्षेत्रात आहेत. त्यामुळे या काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना विशेष प्रयत्न करावे लागतात. एक ते दीड महिना आधीच पोलिसांनी मंडळांशी समन्वय साधून लेसरबंदीची माहिती दिली होती.तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आवाज मर्यादेचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरीही आगमन मिरवणूक आणि गणेशोत्सव काळात काही मंडळांनी आवाज वाढवून सूचनांचे उल्लंघन केले. अशा ७१६ मंडळांवर ध्वनिप्रदूषण कायद्यानुसार न्यायालयात खटले दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विसर्जन मिरवणुकीत आवाज मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.’परिक्षेत्रात नऊ हजार पोलिसांसह पाच हजार २५० होमगार्ड आणि शीघ्रकृती दलाच्या पाच तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात असतील. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेतली जात आहे, अशी माहिती फुलारी यांनी दिली. यावेळी पोलिस अधीक्षक योगेशकुमार, अपर पोलिस अधीक्षक धीरजकुमार बच्चू, शहर उपअधीक्षक प्रिया पाटील, उपअधीक्षक (गृह) तानाजी सावंत, निरीक्षक रवींद्र कळमकर उपस्थित होते.

१७ हजार सराईतांवर कारवायाजिल्हा - गुन्हेगारकोल्हापूर - १९८२सांगली - ६७८२सातारा - २७०५सोलापूर ग्रामीण - ३५४९पुणे ग्रामीण - २३१९

३० गुन्हेगारांवर ‘मोक्कां’तर्गत कारवाईसण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर परिक्षेत्रातील ३० गुन्हेगारांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली. यात वालचंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १३, इस्लामपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १० आणि वडगाव मावळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सात गुन्हेगारांवर कारवाई झाली.

अनंत चतुर्दशीनंतर ईद-ए-मिलादच्या मिरवणुकाशुक्रवारी ईद-ए-मिलाद असले तरी याच्या मिरवणुका अनंत चतुर्दशीनंतर घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते. त्यानुसार परिक्षेत्रात सात सप्टेंबरनंतर या मिरवणुकांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती आयजी फुलारी यांनी दिली.

साताऱ्यातील मंडळाला दंडआवाज मर्यादेचे उल्लंघन केल्याबद्दल सातारा येथील एका गणेश मंडळाला जिल्हा न्यायालयाने १० लाखांच्या दंडाची नोटीस पाठवली आहे. दोषी मंडळांना मोठा दंड व्हावा, यासाठी पोलिस प्रयत्न करतील, अशी माहिती फुलारी यांनी दिली.