Kolhapur: नगरपरिषद अभियंत्याला हातपाय तोडण्याची धमकी, भाजपच्या माजी नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 17:57 IST2025-03-05T17:56:46+5:302025-03-05T17:57:14+5:30
हुपरी : टेंडर प्रक्रियेची कागदपत्रे मागण्याच्या कारणावरून वादावादी करीत नगरपरिषद कार्यालयात गोंधळ घालून बांधकाम अभियंता प्रदीप पांडुरंग देसाई व ...

Kolhapur: नगरपरिषद अभियंत्याला हातपाय तोडण्याची धमकी, भाजपच्या माजी नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल
हुपरी : टेंडर प्रक्रियेची कागदपत्रे मागण्याच्या कारणावरून वादावादी करीत नगरपरिषद कार्यालयात गोंधळ घालून बांधकाम अभियंता प्रदीप पांडुरंग देसाई व लिपिक शुभम काशीद यांना दमदाटी करून हातपाय तोडण्याची धमकी दिल्याप्रकरणी भाजपचे शहराध्यक्ष व माजी नगरसेवक सुभाष बंडू कागले यांच्यावर हुपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी बांधकाम अभियंता प्रदीप देसाई यांनी पोलिसांत फिर्याद दिली असून तपासानंतर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक एन. आर. चौखंडे यांनी दिली आहे.
याबाबत पोलिसांतून समजलेली माहिती अशी, नगरपरिषद प्रशासनाकडून काही दिवसांपूर्वी तीन कोटी पन्नास लाख रुपये खर्चाच्या विकासकामांची टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या विकासकामांचा ठेका चार ठेकेदारांना देण्यात आला आहे.
त्या पार्श्वभूमीवर भाजपचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक सुभाष कागले यांनी शुक्रवारी (ता .२८) पालिकेच्या बांधकाम विभागात जाऊन बांधकाम अभियंता प्रदीप देसाई यांच्याकडे टेंडर प्रक्रियेबाबतच्या कगदपत्रांची मागणी केली. शासकीय कागदपत्रे हवी असतील तर रीतसर लेखी अर्ज करून मागणी करावी असे अभियंता देसाई यांनी यावेळी कागले यांना सांगितले. त्यावरून दोघात वादावादी होऊन जोरदार खडाजंगी झाली होती.