शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

पूरस्थितीत आपतकालीन यंत्रणा सज्ज ठेवा, सतेज पाटील यांनी दिले निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 17:16 IST

Flood Metting Kolhapur : हवामान विभागाने यंदा 110 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पडणाऱ्या संभाव्य पावसाचा व त्यामुळे निर्माण होणाऱ्या पूरस्थितीचा अंदाज लक्षात घेवून प्रशासनाने सर्व आपतकालीन यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले.

ठळक मुद्देपूरस्थितीत आपतकालीन यंत्रणा सज्ज ठेवा सतेज पाटील यांनी दिले निर्देश

कोल्हापूर : हवामान विभागाने यंदा 110 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पडणाऱ्या संभाव्य पावसाचा व त्यामुळे निर्माण होणाऱ्या पूरस्थितीचा अंदाज लक्षात घेवून प्रशासनाने सर्व आपतकालीन यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहूजी सभागृहात संभाव्य पूरस्थितीसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली.यावेळी  पालकमंत्री म्हणाले, पूरस्थितीचा फटका ज्या गावांना सर्वाधिक बसला आहे अशा गावांची संबंधित अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जावून प्रत्यक्ष पाहणी करावी. तसेच जी गावे स्थलांतरीत करावी लागतात अशा गावांवर लक्ष केंद्रीत करुन तेथील नागरिकांची गैरसोय होणार नाही याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, बोटी सज्ज ठेवाव्यात. त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड उभारणीसाठी प्रशासनाने जागा शोधावी.

 ही जागा शोधत असताना दुर्गम तालुक्यांना प्राधान्य देण्यात यावे. आपत्तीसाठी लागणारे मनुष्यबळ सज्ज ठेवण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी पूरस्थितीचा सामना करावा लागणाऱ्या गावांचा आढावा प्रशासनाने घेतला असल्याची माहिती या बैठकीत दिली.यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कृषी अधीक्षक ज्ञानदेव वाकुरे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :floodपूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर