कॉल ड्रॉप, आवाजातील विस्कळीतपणा, ‘नो नेटवर्क’मुळे जनता झाली हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 05:42 PM2020-03-03T17:42:46+5:302020-03-03T17:46:02+5:30

खासगी आॅपरेटर कंपन्यांच्या मोबाईल सेवेत विस्कळीतपणा आल्यामुळे मोबाईलधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटचा कमी वेग, अचानक फोन कट होणे, फोन न लागणे, नेटवर्कच्या बाहेर असणे, आदी समस्यांचा समावेश आहे. आवाज व्यवस्था अडखळीतही बीएसएनएलची सेवा अजूनही आपले अस्तित्व टिकून आहे.

Call drop, noise disturbances, 'No network' caused public outrage | कॉल ड्रॉप, आवाजातील विस्कळीतपणा, ‘नो नेटवर्क’मुळे जनता झाली हैराण

कॉल ड्रॉप, आवाजातील विस्कळीतपणा, ‘नो नेटवर्क’मुळे जनता झाली हैराण

Next
ठळक मुद्देकॉल ड्रॉप, आवाजातील विस्कळीतपणा‘नो नेटवर्क’मुळे जनता झाली हैराण

कोल्हापूर : खासगी आॅपरेटर कंपन्यांच्या मोबाईल सेवेत विस्कळीतपणा आल्यामुळे मोबाईलधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटचा कमी वेग, अचानक फोन कट होणे, फोन न लागणे, नेटवर्कच्या बाहेर असणे, आदी समस्यांचा समावेश आहे. आवाज व्यवस्था अडखळीतही बीएसएनएलची सेवा अजूनही आपले अस्तित्व टिकून आहे.

गेला आठवड्याभरात खासगी आॅपरेटर कंपन्यांच्या मोबाईल सेवांमध्ये विस्कळीतपणा आला आहे. त्याचा फटका मोबाईलधारकांना बसत आहे. विशेषत: कॉल न लागणे, नेटवर्कची गती कमी असणे, बोलणे मध्येच कट होणे, आवाजात विस्कळीतपणा, आदी समस्यांमुळे अनेकांची घालमेल होत आहे.

सेवेतील विस्कळीतपणामुळे अनेक कंपन्यांतील कर्मचाऱ्यांची कामेच होत नाहीत. विशेषत: वित्तीय संस्थांमधील कर्मचाऱ्यांना या मनस्तापाला अधिक सामोरे जावे लागत आहे. बोलणे कमी झाल्यानंतर अनेकांनी व्हॉटस्अ‍ॅपवर आपले कामकाज करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातही गती नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत खासगी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी आपल्याला याबाबत बोलण्याचा अधिकार नाही. वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधा, असे सांगितले. याबाबत नागरिकांतून उलटसुलट चर्चेला ऊत आला आहे.

‘बीएसएनएल’ अजूनही ‘बेस्ट ’

सोमवारी सायंकाळी ५-४५ मिनिटांनी बीएसएनएलची प्रमुख नेटवर्क डाटा लाईन इस्लामपूर (ता. वाळवा, सांगली) येथे बंद पडली. यावर नेमका कुठे दोष आहे, याची माहिती मिळाल्यानंतर कोल्हापुरातील तांत्रिक पथकाने तेथे जाऊन हा दोष दूर करीत ही सेवा पुन्हा रात्री ८ वाजता पूर्ववत केली. विशेष म्हणजे ३१ जानेवारी रोजी बीएसएनएलचा सुमारे ४०० हून अधिक कर्मचारी वर्गाने कंपनीच्या धोरणामुळे स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. तरीसुद्धा यातील तीनशेहून अधिक कर्मचारी स्वेच्छेने दोष दुरुस्तीसाठी विनामोबदला रोज कार्यालयात येतात. यातही यातील काही कर्मचाºयांनी सहभाग घेत ही दोष दुरुस्ती केली.




 

 

Web Title: Call drop, noise disturbances, 'No network' caused public outrage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.