वड्डेटीवार पुतळा जाळण्यावरून झाली झटापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:58 IST2021-02-05T06:58:38+5:302021-02-05T06:58:38+5:30

लोकमत न्यूुज नेटवर्क कोल्हापूर : मराठा समाजाबद्दल कथित अनुद्‌गार काढणारे मंत्री विजय वड्डेटीवार यांच्या पुतळा दहनाचा प्रयत्न करताना मराठा ...

The burning of the Vaddetiwar statue caused a commotion | वड्डेटीवार पुतळा जाळण्यावरून झाली झटापट

वड्डेटीवार पुतळा जाळण्यावरून झाली झटापट

लोकमत न्यूुज नेटवर्क

कोल्हापूर : मराठा समाजाबद्दल कथित अनुद्‌गार काढणारे मंत्री विजय वड्डेटीवार यांच्या पुतळा दहनाचा प्रयत्न करताना मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते व पोलीस यांच्यात मंगळवारी दसरा चौकात झटापट झाली. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात आंदोलकांवर साथरोग प्रतिबंध अधिनियमप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन कायद्यांर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठीच्या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा यांच्यावतीने दसरा चौकात ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलनाला आमदार चंद्रकांत जाधव यांनी भेट दिली. त्यानंतर दुपारी साडेबाराच्या दरम्यान त्याठिकाणी काही कार्यकर्त्यांनी गाडीमध्ये एक पुतळा करून आणला होता. मंत्री वड्डेटीवार मराठा समाजाबद्दल अनुद्‌गार असल्याच्या निषेधार्थ हा पुतळा जाळण्यात येणार होता. मात्र, त्यापूर्वीच तो पोलिसांच्या हाती लागला. पुतळा ताब्यात घेण्यासाठी पोलीस आणि आंदोलकांत झटापट झाली. त्यामुळे आंदाेलक दिलीप पाटील, सचिन तोडकर, स्वप्निल पार्टे, धनश्री तोडकर, गायत्री राऊत, जयश्री वायचळ यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

---

फोटो नं २७०१२०२१-कोल्-मराठा आंदोलन

ओळ : कोल्हापुरातील दसरा चौकात मंगळवारी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा यांच्यावतीने दसरा चौकात झालेल्या ठिय्या आंदोलनावेळी कार्यकर्ते व पोलिसांमध्ये झटापट झाली (छाया : नसीर अत्तार)

--

Web Title: The burning of the Vaddetiwar statue caused a commotion