Kolhapur Crime: वीस गुंठे जमिनीसाठी भावासह बापाचा निर्घृण खून; कुऱ्हाड, खोऱ्याने केले वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 11:56 IST2026-03-30T11:56:26+5:302026-03-30T11:56:47+5:30

आरोपी पोलिसांत हजर, हाणामारीत मुलगाही गंभीर जखमी

Brutal murder of father and brother over twenty gunthas of land in Hatkanangale Kolhapur | Kolhapur Crime: वीस गुंठे जमिनीसाठी भावासह बापाचा निर्घृण खून; कुऱ्हाड, खोऱ्याने केले वार

Kolhapur Crime: वीस गुंठे जमिनीसाठी भावासह बापाचा निर्घृण खून; कुऱ्हाड, खोऱ्याने केले वार

हातकणंगले (जि. कोल्हापूर) : वीस गुंठे जमिनीच्या वादातून हिंगणगाव (ता. हातकणंगले) येथे रविवारी सायंकाळी संभाजी मारुती कुंडले (वय ४७) आणि त्यांचा मुलगा विवेक संभाजी कुंडले (२०) या दोघांनी कुऱ्हाड आणि खोऱ्याचे घाव घालून लहान भाऊ शीतल मारुती कुंडले (४०) आणि वडील मारुती बंडू कुंडले (७२) यांचा खून केला. 

दोघांचे खून करून संभाजी कुंडले हातकणंगले पाेलिस ठाण्यात हजर झाला तर विवेक हाणामारीत गंभीर जखमी झाला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या खुनाचा गुन्हा रात्री उशिरा पोलिस ठाण्यात दाखल झाला.

हिंगणगाव येथील मारुती कुंडले यांना संभाजी आणि शीतल अशी दोन मुले आहेत. घराच्या पाठीमागे त्यांची शेती आहे. मारुती कुंडले यांना ३ एकर शेती होती. त्यापैकी थोरला संभाजी याला १ एकर तर लहान शीतलला २ एकर जमीन दिली होती. लहान भावाला २० गुंठे जमीन जादा दिल्याच्या कारणावरून कुंडले कुटुंबामध्ये वारंवार वाद होत होते. दोघा भावांमध्ये शेतीच्या वादावरून गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. 

रविवारी सायंकाळच्या सुमारास संभाजीचा मुलगा विवेक (२०) आणि आजोबा मारुती यांच्यामध्ये जमिनीवरून वाद झाला. मुलाबरोबर झालेल्या वादाची माहिती संभाजी याला लागताच त्याने संतापाच्या भरात कुऱ्हाडीने वडील आणि लहान भावावर हल्ला केला. भाऊ शीतल यांच्या डोक्यात, तोंडावर वर्मी घाव घातले तर वडील मारुती यांच्या डोक्यात आणि मानेवर घाव बसल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.

Web Title : कोल्हापुर: जमीन विवाद में भाई और पिता की निर्मम हत्या; दो गिरफ्तार

Web Summary : कोल्हापुर में, जमीन के विवाद में एक पिता और पुत्र की निर्मम हत्या कर दी गई। संभाजी कुंडले और उसके बेटे विवेक ने संभाजी के भाई और पिता को कुल्हाड़ियों से मार डाला। संभाजी ने आत्मसमर्पण कर दिया, और विवेक को लड़ाई में घायल होने के बाद गिरफ्तार कर लिया गया।

Web Title : Kolhapur: Land Dispute Leads to Fratricide and Patricide; Two Arrested.

Web Summary : In Kolhapur, a land dispute led to the brutal murder of a father and son. Sambhaji Kundale and his son Vivek killed Sambhaji's brother and father with axes. Sambhaji surrendered, and Vivek was arrested after being injured in the fight.