Kolhapur Crime: शहापूर - कृष्णानगर येथे तरुणाचा निर्घृण खून, चेहरा छिन्नविच्छिन्न केल्याने ओळख पटवणे कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 11:58 IST2026-02-18T11:57:53+5:302026-02-18T11:58:37+5:30

फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने घटनास्थळावरून काही पुरावे गोळा केले

Brutal murder of a young man in Shahapur Krishnanagar Kolhapur | Kolhapur Crime: शहापूर - कृष्णानगर येथे तरुणाचा निर्घृण खून, चेहरा छिन्नविच्छिन्न केल्याने ओळख पटवणे कठीण

Kolhapur Crime: शहापूर - कृष्णानगर येथे तरुणाचा निर्घृण खून, चेहरा छिन्नविच्छिन्न केल्याने ओळख पटवणे कठीण

इचलकरंजी : शहापूर येथील कृष्णानगर परिसरातील महालक्ष्मीनगर येथे एका अनोळखी तरुणाचा रुमालाने गळा आवळून आणि डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आज, बुधवारी सकाळी उघडकीस आली. हल्लेखोरांनी तरुणाचा चेहरा छिन्नविच्छिन्न केला असल्याने त्याची ओळख पटवणे कठीण झाले आहे. घटनास्थळी शहापूर पोलिस, फॉरेन्सिक लॅबचे पथक तसेच श्वान पथकाने भेट दिली आहे. तरुणाची ओळख पटल्यानंतर तपासाला गती येणार आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

कृष्णानगरकडून सोलगेमळ्याकडे जाणाऱ्या निर्जन रस्त्यावरील मोकळ्या रानात एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती सकाळी शहापूर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. मृतदेहाशेजारी रक्ताने माखलेला दगड आणि मृताचे चप्पल मिळून आले आहे. फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने घटनास्थळावरून काही पुरावे गोळा केले आहेत. 

श्वान पथकाने घटनास्थळापासून सोलगे माळ्याच्या दिशेने माघ काढला. घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड, शहापूरचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्यासह पथकाने भेट दिली. मृताची ओळख पटवण्याचे काम सुरू असून त्यानंतर तपासाला गती येईल. मृतदेह शिवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

Web Title : कोल्हापुर अपराध: युवक की निर्मम हत्या; चेहरा विकृत, पहचान मुश्किल

Web Summary : कोल्हापुर के शाहपुर में एक युवक की निर्मम हत्या कर दी गई, उसका चेहरा विकृत कर दिया गया, जिससे पहचान मुश्किल हो गई। पुलिस अपराध स्थल की जांच कर रही है, पीड़ित की पहचान करने और अपराधियों को खोजने के लिए फोरेंसिक सबूत इकट्ठा कर रही है। मकसद अज्ञात है।

Web Title : Kolhapur Crime: Young Man Brutally Murdered; Face Disfigured, Identification Difficult

Web Summary : A young man was brutally murdered in Kolhapur, his face disfigured, making identification difficult. Police are investigating the crime scene in Shahapur, gathering forensic evidence to identify the victim and find the perpetrators. The motive remains unknown.