शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

देवीच्या जागरसाठी आणले अन् जेवणातून गुंगींचे औषध देऊन लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:55 IST

कोल्हापूर : देवीचा जागर (आराधी) करण्यासाठी कोल्हापुरात बोलविलेल्या लातूर जिल्ह्यातील राचन्नावाडी (ता. चाकूर) येथील कलाकारांना जेवणातून गुंगीचे औषध देऊन ...

कोल्हापूर : देवीचा जागर (आराधी) करण्यासाठी कोल्हापुरात बोलविलेल्या लातूर जिल्ह्यातील राचन्नावाडी (ता. चाकूर) येथील कलाकारांना जेवणातून गुंगीचे औषध देऊन लुटण्याचा प्रकार घडला. बेशुद्ध होऊन निपचीत पडलेल्या महिला व पुरुषांच्या अंगावरील लाखो रुपये किमतीचे दागिने व रोकड घेऊन लुटारूने पोबारा केला. बिंदू चौकानजीक गंजी गल्लीतील एका यात्रीनिवासमध्ये हा प्रकार बुधवारी दुपारी बारा वाजता उघडकीस आला. बेशुद्धावस्थेतील व काही गुंगीतील नऊजणांना पोलिसांनी उपचारासाठी सीपीआर रुग़्णालयात दाखल केले. कोल्हापुरात मध्यवस्तीत यात्री निवासमध्ये अशा पद्धतीने लुटण्याचा प्रकार प्रथमच घडल्याने खळबळ माजली.

उपचार घेत असलेले पुढीलप्रमाणे : सखुबाई पिराजी सूर्यवंशी (वय ४०), द्रुपदा मल्हारी सूर्यवंशी (५०), कमलाबाई महादेव कांबळे (५५), कुमाबाई रामकिशन कौर (४०), ताईबाई मल्हारी सूर्यवंशी (४५), मसनाजी पांडुरंग चिंचोळे (२४), रामकिशन सीताराम कौर (४८), अशोक अंकुश भरळे (५५), मल्हारी गणपती सूर्यवंशी (४२, सर्व रा. राचन्नावाडी, ता. चाकूर, जि. लातूर).

राचन्नावाडी येथील देवीचा जागर (आराधी) करणाऱ्या ग्रामीण कलाकारांच्या नऊजणांच्या ग्रुपला कोल्हापुरात अंबाबाई देवीची गाणी म्हणण्याच्या कार्यक्रमासाठी एका व्यक्तीने फोनवरच नियोजन करून पाचारण केले. त्यांना १४ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार पाच महिला व चार पुरुष असे झांज, ढोलकी साहित्य घेऊन एस.टी. बसने मंगळवारी मध्यरात्री कोल्हापुरात आले. त्यांना मध्यवर्ती बसस्थानक परिसरात संबंधित व्यक्तीने गाठले. तेथून सर्वांना रिक्षाने गंजी गल्लीतील यात्रीनिवासातील रूममध्ये ठेवले. लुटारूने येतानाच त्यांच्यासाठी जेवण आणले. रात्रीच्यावेळी सर्व जेवले, त्यानंतर काही वेळातच सर्वांना चक्कर येऊन बेशुद्ध पडले. त्यानंतर लुटारूने महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व बॅगमधील रोकड घेऊन पहाटे पलायन केले.

सकाळी नऊ वाजता यात्री निवासचा कामगार त्यांना चेकआऊटसाठी आला; पण दरवाजाला कुलूप दिसले. भाविक अंबाबाई दर्शनासाठी गेले असावेत असे त्याला वाटले. दुपारी बाराच्या सुमारास सखुबाई सूर्यवंशी या महिलेने आतून दरवाजा ठोठावल्याने व्यवस्थापक अमर पाटील याने दुसऱ्या चावीने कुलूप काढून दरवाजा उघडला.

रूममधील दृश्य भयानकच होते. दोन महिला व एक पुरुष गुंगीत होते, तर इतर बेशुद्धावस्थेत निपचीत पडले होते. त्याने मालक उत्तम पाटील (रा. साळोखेनगर) यांना याची माहिती कळवली. पोलीस घटनास्थळी आले, त्यावेळी लुटीचा प्रकार उघड झाला. सर्वांना सीपीआरमध्ये दाखल केले. दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.

मोबाईल फोडला, इतर पाण्यात बुडविले

कार्यक्रमासाठी लुटारूने संबंधित कलाकारांना ज्या फोनवर फोन केले, तो मोबाईल फोडला, तर इतर मोबाईल हे पाण्याच्या बादलीत बुडवून ठेवले. तसेच ती बादली बाथरूममध्ये पोलिसांना मिळाली.

सीसी फुटेजमध्ये लुटारू कैद

संबंधित लुटारू हा ४० वयोगटातील असून, त्याने मंगळवारी सायंकाळीच यात्रीनिवासमध्ये रूम बुकबाबत चौकशी केली. तो रात्री १२ वाजता सर्वांना घेऊन आला. त्याने सखुबाई सूर्यवंशी नावाने रूम ताब्यात घेतली, त्यांचे आधारकार्डही ठेवून घेतले. लुटारूने आपला डाव आटोपता घेऊन पहाटे दाराला बाहेरून कुलूप घालून पोबारा केला. लुटारूची हालचाल यात्री निवासमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली, ते फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले.