शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

संक्षिप्त वृत्त - जिल्हाधिकारी कार्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:15 IST

कोल्हापूर : राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेसाठी लाभार्थी संस्था, वैयक्तिक लाभार्थी यांनी आपले प्रस्ताव संबंधित तालुक्याच्या पशुधन अधिकारी (विस्तार) पंचायत ...

कोल्हापूर : राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेसाठी लाभार्थी संस्था, वैयक्तिक लाभार्थी यांनी आपले प्रस्ताव संबंधित तालुक्याच्या पशुधन अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्यामार्फत १५ फेब्रुवारीपर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांनी केले आहे. या योजनेसाठी केंद्राचा ६० व राज्याचा ४० टक्के हिस्सा जमिनीच्या प्रकारानुसार प्रतिहेक्टरसाठी दिला जातो. तरी संस्थांनी विहीत नमुन्यामधील प्रस्ताव इंग्रजीत सादर करावेत. लाभार्थ्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज, जमिनीचा सातबारा उतारा व ८-अ चा दाखला व लाभार्थींकडे पशुधन असल्याबाबतचे नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील प.वि.अ. यांचे प्रमाणपत्र सादर करावे.

अधिक माहितीसाठी अर्जाचा नमुना kolhapur.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

---

गॅस वितरण वाहनावर दैनंदिन दरफलक लावावेत

कोल्हापूर : गॅस कंपन्यांनी सर्व गॅस सिलिंडर वितरण वाहनांवर दैनंदिन दर फलक लावावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी दिल्या.

ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी परिषदेचे अशासकीय सदस्य व शासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी मागील ग्राहक संरक्षण बैठकीमध्ये प्राप्त झालेल्या १७ तक्रार अर्जांबाबत चर्चा करून निपटारा करण्यात आला. पोलीस विभाग, जिल्हा आरोग्य विभाग, सहाय नियंत्रण वैधमापन शास्त्र, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ या विभागांबाबतच्या अर्जाबाबत चर्चा करून निराकरण करण्यात आले.

--