संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:24 IST2021-04-28T04:24:34+5:302021-04-28T04:24:34+5:30

इचलकरंजी : श्री वर्धमान नागरी सहकारी पतसंस्थेस आर्थिक वर्षात ५२ लाखांचा ढोबळ नफा झाला. सर्व तरतुदीनंतर निव्वळ नफा ४४ ...

Brief news | संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

इचलकरंजी : श्री वर्धमान नागरी सहकारी पतसंस्थेस आर्थिक वर्षात ५२ लाखांचा ढोबळ नफा झाला. सर्व तरतुदीनंतर निव्वळ नफा ४४ लाख ४१ हजार इतका शिल्लक राहिला असून, संस्थेच्या एकूण ठेवी बारा कोटी ३७ लाखांच्या आहेत. संस्थेने एनपीए शून्य टक्के राखला आहे, अशी माहिती अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

.............

कोरोचीत नागरी सुविधांचा अभाव

इचलकरंजी : कोरोची (ता. हातकणंगले) येथील विवेकानंद नगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव दिसून येत आहे. भागात गटारी व रस्ते नाहीत. गटारीचे पाणी थेट रस्त्यावर सोडले जात असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तरी ग्रामपंचायतीने लक्ष देऊन सोयी-सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी होत आहे.

...........

रस्ता करण्याची मागणी

कबनूर : डेक्कन रोडजवळील एकता चौक ते मराठी शाळेजवळील रस्ता खराब झाला आहे. रस्त्यावर गटार व शौचालयांचे पाणी साचत आहे. यामुळे तेथे डासांचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहे. तरी हा रस्ता लवकर करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Web Title: Brief news