संक्षिप्त.. क्राईम०२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:37 IST2020-12-14T04:37:12+5:302020-12-14T04:37:12+5:30

कोल्हापूर : कोडोली (ता. पन्हाळा) येथे गुऱ्हाळघरात ऊस यंत्रामध्ये घालताना हात अडकून कामगार गंभीर जखमी झाला. रणजितकुमार मंगल ठाकूर ...

Brief .. Crime 02 | संक्षिप्त.. क्राईम०२

संक्षिप्त.. क्राईम०२

कोल्हापूर : कोडोली (ता. पन्हाळा) येथे गुऱ्हाळघरात ऊस यंत्रामध्ये घालताना हात अडकून कामगार गंभीर जखमी झाला. रणजितकुमार मंगल ठाकूर (वय २७, रा. कोडोली, ता. पन्हाळा) असे जखमी कामगाराचे नाव आहे. त्यांना जखमी अवस्थेत सीपीआर रुग़्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

एकास मारहाण

कोल्हापूर : पाटगाव (ता. भुदरगड) येथे हॉटेलमध्ये झालेल्या मारामारीत एकजण जखमी झाला. अभिजित विठ्ठल पाटील (वय २९, रा. कलानगर, भुदरगड) असे जखमीचे नाव असून त्यांच्यावर सीपीअार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली.

पेंटिंगला दिलेल्या मोटारीची चोरी

कोल्हापूर : पेंटिंगला दिलेली मोटारकार चोरीला गेल्याची घटना ओढ्यावरील रेणुकादेवीच्या मंदिरानजीक घडली. शेखर भाऊसाहेब बोभाटे (रा. मंडलिक वसाहत, सुभाष रोड) हे चिरमुरे व्यापारी असून त्यांनी आपली मोटारकार दि. २५ नोव्हेंबर रोजी पेंटरकडे पेंटिंगसाठी दिली होती. ती चोरीला गेल्याची तक्रार बोभाटे यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली.

दोघे दुचाकीस्वार जखमी

कोल्हापूर : रंकाळा चौपाटीनजीक दुचाकी अपघातात दोघे जखमी झाल्याची घटना घडली. शशांक प्रभाकर जाधव (वय ३४, रा. कसबा बावडा) व राहुल सुरेश शेळके (२५, रा. फुलेवाडी) अशी जखमींची नावे आहेत. हा अपघात शनिवारी रात्री घडला. त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे.

(तानाजी)

Web Title: Brief .. Crime 02