अल्पवयीन मुलीला अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी दोघे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:28 IST2021-03-09T04:28:39+5:302021-03-09T04:28:39+5:30

कोल्हापूर : अल्पवयीन मुलीशी छेडछाड करून तिला अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी करवीर पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली. इम्दादउल्ला बशीर नायकवडे ...

Both of them were arrested for sending obscene messages to a minor girl | अल्पवयीन मुलीला अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी दोघे गजाआड

अल्पवयीन मुलीला अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी दोघे गजाआड

कोल्हापूर : अल्पवयीन मुलीशी छेडछाड करून तिला अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी करवीर पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली. इम्दादउल्ला बशीर नायकवडे (२०, रा. शनिवार पेठ), इम्तियाज शब्बीरखान पठाण (२१, रा. लक्षतीर्थ वसाहत) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अल्पवयीन मुलीची वारंवार छेडछाड काढून तिला मोबाइलवर वारंवार अश्लील मेसेज पाठवून तिला वारंवार त्रास दिला. त्याबाबत करवीर पोलीस ठाण्यात पीडित मुलीने शनिवारी (दि. ६ मार्च) सायंकाळी तक्रार दिली. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा इम्दादउल्ला नायकवडे, इम्तियाज पठाण यांना अटक केली. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता दि. १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

फोटो नं. ०८०३२०२१-कोल-इम्दादउल्ला नायकवडे (आरोपी)

फोटो नं. ०८०३२०२१-कोल-इम्तियाज पठाण (आरोपी)

Web Title: Both of them were arrested for sending obscene messages to a minor girl