शहरं
Join us  
Trending Stories
1
ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
2
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
3
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
4
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
5
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
6
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
7
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
8
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
9
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
10
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
11
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
12
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
13
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
14
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
15
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
16
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
17
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
18
मार्कशीटमधील खाडाखोड कळली अन् बापाची सटकली; ९ वर्षांच्या मुलीला क्रूरपणे संपवलं, नंबर १ चा होता अट्टहास
19
रंगांचा खेळ! रेड, ग्रीन तर माहितीय पण फूड पॅकेजिंगवरील ब्लू, येलो मार्कचा नेमका अर्थ काय?
20
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या अडीच हजारासाठी दोघांचा गेला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 10:58 IST

Crime News Court Kolhapur- व्याजाचे अडीच हजार रुपये देण्यावरून वाढला वाद, मध्यस्थी करणारा रमी क्लबचालक नितीन शिंदे व त्याचा मित्र समीर खाटीक यांचा दहा जणांनी पाठलाग करून तलवार, सत्तूर, कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. टेंबलाई रेल्वे फाटक उड्डाण पुलानजीक घडलेल्या घटनेला तब्बल सात वर्षांनी शनिवारी उजाळा मिळाला. या दुहेरी खूनप्रकरणी न्यायालयाने घायल कवाळे, हाणमा चव्हाणसह नऊ जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. प्रत्यक्षात वर्चस्ववादातून ही दुहेरी खुनाची घटना घडल्याची चर्चा परिसरात होती.

ठळक मुद्दे सात वर्षांनी घटनेला उजाळा रेल्वे फाटक उड्डाण पूल परिसर घटनेने हादरला

कोल्हापूर : व्याजाचे अडीच हजार रुपये देण्यावरून वाढला वाद, मध्यस्थी करणारा रमी क्लबचालक नितीन शिंदे व त्याचा मित्र समीर खाटीक यांचा दहा जणांनी पाठलाग करून तलवार, सत्तूर, कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. टेंबलाई रेल्वे फाटक उड्डाण पुलानजीक घडलेल्या घटनेला तब्बल सात वर्षांनी शनिवारी उजाळा मिळाला. या दुहेरी खूनप्रकरणी न्यायालयाने घायल कवाळे, हाणमा चव्हाणसह नऊ जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. प्रत्यक्षात वर्चस्ववादातून ही दुहेरी खुनाची घटना घडल्याची चर्चा परिसरात होती.

थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, मृत समीर व आरोपी घायल कवाळे हे टेंबलाई झोपडपट्टीत शेजारी-शेजारी राहतात. २०११ मध्ये समीरचे कुत्रे हणमा चव्हाण व घायल कवाळे यांनी मारले व समीरच्याच घराच्या दारात जाळले होते. त्यातून कवाळे याने समीरचे घर पेटवले होते, तर त्या रागातूनच समीरने घायलच्या खुनाचा प्रयत्न केला होता.

दरम्यान, कोटीतीर्थ परिसरातील नितीन शिंदे याच्या रमी क्लबवर समीर खाटीक व अमित हेगडे कामास होते. अमितने हणमा चव्हाणकडून पाच हजार रुपये व्याजाने घेतले, त्याची त्याने परतफेड केली, पण अडीच हजार रुपये व्याजावरून वाद वाढला. त्यात मध्यस्थी करताना नितीनचा हणमासोबत वाद झाला. त्यातून नंतर वाद वाढतच गेला. तत्पूर्वी नितीन व समीरला संपवण्यासाठी हणमा चव्हाण, घायल कवाळे व त्याच्या साथीदारांनी कट रचला.

दि. ४ फेब्रुवारी २०१४ रोजी नितीन व समीर जेवण करून येऊन रेल्वे उड्डाणपूल चौकात उभारले. त्यावेळी हणमा, घायलसह आठ-दहाजण मोटारीतून आले. त्यांनी या दोघांवर हल्ला केला. त्यावेळी समीरला उड्डाण पुलाखालीच संपवले, तर नितीनचा कोयास्को चौकापर्यंत पाठलाग करून त्याचा निर्घृण खून केला.

आईनेच पाहिला मृतदेह

मृत समीरची आई रात्रीच्यावेळी हॉटेलवरील काम आटोपून घरी परतत होती. त्यांना रेल्वे फाटकानजीक पुलाखाली कोणी तरी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. त्यांनी पोलिसांना सांगितले. पण तो मृतदेह त्यांच्या मुलालाच असल्याचे नंतर त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी हंबरडा फोडला.
 

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर