शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही काँग्रेस, भाजपमध्ये रस्सीखेच

By admin | Updated: October 9, 2014 23:06 IST

राजकीय वातावरण तप्त : शाब्दिक चकमकी; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

राजाराम पाटील - इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून आयोजित पदयात्रा व कोपरसभांतून होणाऱ्या शाब्दिक चकमकी आणि आरोप-प्रत्यारोपांच्या झडणाऱ्या फैरीमुळे राजकीय वातावरण तप्त झाले आहे. पक्ष आणि आघाडीपेक्षा गटातटांच्या राजकारणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मतदारांशी थेट संपर्कावर भर दिला जात असून राष्ट्रीय, राष्ट्रवादी या दोन्ही कॉँग्रेससह भाजप अशी तिरंगी लढत रंगण्याची चिन्हे स्पष्ट होत आहेत.इचलकरंजी हे हातकणंगले तालुक्यातील मोठे औद्योगिक शहर असल्याने त्याचे स्वतंत्र अस्तित्व आहे. मतदारसंघावर कॉँग्रेसचे वर्चस्व असले तरी गेल्या साठ वर्षांत कॉँग्रेसला चारवेळा मोठा धक्का मिळाला आहे. अलीकडील पंचवीस-तीस वर्षांत येथील कॉँग्रेस पक्षात कल्लाप्पाण्णा आवाडे एक वेळ मंत्री आणि दोनवेळा खासदार झाले. त्यांचे पुत्रसुद्धा पाच वेळा आमदार आणि तीनवेळा मंत्री झाल्याने आवाडे पिता-पुत्रांचा दबदबा येथे राहिला. मात्र, त्यामुळे इचलकरंजीच्या राजकारणात कॉँग्रेस (आवाडे) विरुद्ध बाकी सर्वजण असेसुद्धा चित्र निर्माण झाले.राज्य पातळीवर भाजप-शिवसेना युती आणि राष्ट्रीय व राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील आघाडी तुटली आणि भाजप व कॉँग्रेस वगळता अन्य पक्षांच्या स्थानिक नेत्यांची धावपळ उडाली. राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये फूट पडली, तर शहर विकास आघाडीची छकले झाली. कॉँग्रेस व राष्ट्रवादीतील काही गट एकत्र येऊन ‘शविआ’ची निर्मिती झाली होती. त्यापैकी शिवसेना, कॉँग्रेस व राष्ट्रवादीतील गटांमध्येही तट पडले. शिवसेनेचा एक गट भाजपच्या उमेदवाराबरोबर राहिला, तर दुसऱ्या गटाने स्वकीय शिवसेनेचा उमेदवार स्वीकारला. कॉँग्रेसमधील आवळे गट राष्ट्रीय कॉँग्रेसबरोबर आणि राष्ट्रवादीतील काही नगरसेवक स्वकीय उमेदवाराकडे, तर काही भाजपकडे असे चित्र निर्माण झाले.भाजपचे उमेदवार सुरेश हाळवणकर यांच्या प्रचारासाठी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी व परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या जाहीर सभा झाल्या. सभांमध्ये स्थानिक नेत्यांनी आवाडेंवर जोरदार टीकाटिप्पणी केली असली तरी मंत्र्यांनी मात्र इचलकरंजी स्पेशल टेक्स्टाईल झोन करण्याची ग्वाही दिली. इकडे आवाडेंच्या पदयात्रा व प्रचार सभांमध्ये कॉँग्रेसने केलेल्या विकासकामांचा आढावा, वस्त्रोद्योगाची उन्नती, याबरोबरच हाळवणकरांवर टीका केली जात आहे. राष्ट्रवादीच्या मदन कारंडे यांच्याही पदयात्रा व कोपरा सभा सुरू आहेत. त्यातून राष्ट्रवादीच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांचा आढावा घेतला जात आहे. अशाच प्रकारे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदाशिव मलाबादे, शिवसेनेचे मुरलीधर जाधव व मनसेचे मोहन मालवणकर यांच्या पदयात्रा होत आहेत, तर कामगार नेते मिश्रीलाल जाजू हे कामगारांना त्यांचा प्रतिनिधी म्हणून मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत.अशा पार्श्वभूमीवर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय कॉँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी कॉँग्रेस यांच्यात चुरशीची लढत होत आहे. मात्र, कॉँग्रेस आणि भाजपमध्ये परस्परांवर करण्यात येणाऱ्या टीकाटिप्पणीमुळे वातावरण तापलेले आहे. युती व आघाडी तुटल्यानंतर प्रथमच होणाऱ्या या निवडणुकीच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.इचलकरंजी एकूण मतदार २,६८,९९१प्रचारातील मुद्देहाळवणकर यांचे वीज चोरी प्रकरण आणि त्यासंदर्भात झालेल्या कोर्टबाजीबाबतची उलटसुलट चर्चा.आवाडे घराणे, संस्थांचे राजकारण, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी.वस्त्रोद्योगाच्या उन्नती-विकासासाठी राबविलेल्या योजना व उपक्रम कॉँग्रेसचा मुद्दा, तर इचलकरंजी टेक्स्टाईल हब करण्याची भाजपची ग्वाही.युती आणि आघाडी तुटल्याने गटा-तटाच्या ध्रुवीकरणात स्थानिक नेत्यांची झालेली दमछाक.