शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Mayor: रुपाराणी निकम-सचिन शेंडे यांच्यात आज महापौरपदासाठी लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 11:26 IST

महापालिका राजकारणाचा नवा अध्याय : अक्षय जरग-दुर्वास कदम यांच्यात उपमहापौरपदासाठी चुरस

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा कारभार खऱ्या अर्थाने आज, शुक्रवारपासून लोकप्रतिनिधींच्या हाती सोपविला जात आहे. त्यासाठी नुकत्याच झालेल्या सार्वजनिक निवडणुकीनंतर महानगरपालिकेची पहिलीच विशेष सर्वसाधारण सभा पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली होत असून त्यामध्ये महापौर व उपमहापौर यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात येईल.कोल्हापूर महापौरपदासाठी भाजपच्या रुपाराणी संग्राम निकम तर काँग्रेसच्या सचिन मारुती शेंडे यांनी तर उपमहापौरपदासाठी जनसुराज्य शक्तीकडून अक्षय विक्रम जरग तर काँग्रेसकडून दुर्वास परशुराम कदम यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. सभागृहातील संख्याबळ पाहता महायुतीच्या रुपाराणी निकम तर अक्षय जरग यांची निवड निश्चित असून आज, शुक्रवारच्या सभेत त्यावर हात वर करून मतदान घेतले जाईल आणि त्यानंतर पीठासन अधिकारी या दोघांची निवड घोषित करतील.महानगरपालिकेची निवडणूक गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित होती. त्यामुळे लोकप्रतिनिधींचा कारभार प्रशासकांच्या हाती एकवटला होता. एकीकडे प्रशासक कारभार करत असताना दुसरीकडे महापालिकेच्या निवडणुका कधी होतात आणि आपण नगरसेवक म्हणून कधी निवडून येतोय याची अनेक जण स्वप्न पाहत होते. अखेर १६ जानेवारी रोजी शहरातील ८१ जणांना नगरसेवक होण्याचे भाग्य लाभले. आता शुक्रवारपासून लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू होत आहे.नगरसेवक एकत्र येणार महापालिकेतमहायुतीच्या सर्व नगरसेवकांना सकाळी साडेआठ वाजता नागाळा पार्क येथील भाजप कार्यालयात तर काँग्रेस-उद्धवसेनेच्या नगरसेवकांना ताराबाई पार्क येथील अजिंक्यतारा कार्यालयात गोळा होण्याचे निरोप नवनिर्वाचित नगरसेवकांना देण्यात आले आहे. तेथून ते एकत्रपणे महापालिका चौकात येणार आहेत. या नगरसेवकांच्या सोबत महायुती, काँग्रेसचे नेतेही महापालिका चौकात येतील.नगरसेवकांना व्हीप लागूमहापालिका सभागृहातील महायुतीचे संख्याबळ पाहता खबरदारी म्हणून महायुतीच्या सर्व नगरसेवकांना अधिकृत उमेदवार रुपाराणी निकम यांना मतदान करण्याबाबत गटनेते मुरलीधर जाधव यांनी व्हीप लागू केला. काँग्रेसकडूनही व्हीप लागू करण्याची प्रक्रिया सायंकाळनंतर सुरू झाल्याचे गटनेते इंद्रजित बोंद्रे यांनी सांगितले.

अशी होणार निवडणूक प्रक्रिया - सकाळी ११ वाजता होणार विशेष सर्वसाधारण सभा- बरोबर ११ वाजता सभागृहाची सर्व दरवाजे होणार बंद- राष्ट्रगीताने होणार सभेला सुरुवात- नगरसेवकांच्या हजेरीपत्रकावर घेणार सह्या- नगरसचिव विशेष सर्वसाधारण सभेचा अजेंडा वाचून दाखवणार- महापौरपदासाठी दोन अर्ज आल्याने माघारीसाठी १५ मिनिटांचा अवधी- कोणी माघार घेतली तर बिनविरोध आणि नाही घेतली तर मतदान होणार- सभागृहात हात वर करून होणार मतदान, सर्व प्रक्रियेचे होणार चित्रीकरण- पीठासन अधिकारी करणार विजयी उमेदवारांच्या नावाची घोषणा

सभागृहातील संख्याबळमहायुती : भाजप- २६, शिंदे सेना १५, राष्ट्रवादी - ४ जनसुराज्यशक्ती १ = ४६काँग्रेस - ३४, उद्धवसेना - १ = ३५

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Mayor Election: Nikam vs. Shende face-off for the post today.

Web Summary : Kolhapur Municipal Corporation elects its Mayor today. BJP's Nikam and Congress's Shende are contesting. Mahayuti holds majority, likely favoring Nikam. Election process includes roll call, agenda reading, and voting. Results will be announced by the presiding officer.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६MayorमहापौरMahayutiमहायुतीBJPभाजपाcongressकाँग्रेस