शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
3
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांना भाजपाला इशारा
4
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
5
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
6
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
7
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
8
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
9
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
10
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
11
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
12
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
13
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
14
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
15
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
16
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
17
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
18
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
19
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
20
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?

सिनेसृष्टीतील लोकांना बेरोजगार करण्याचा भाजपचा डाव : सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2020 4:31 PM

Satej Gyanadeo Patil , chandrakant patil, bollywood, Mumbai, kolhapur मुंबईतील सिनेसृष्टीशी संबंधितांना बेरोजगार करण्याचे भाजपचा डाव असल्याचा खळबळजणक आरोप पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आज, बुधवारी मुंबई येथे होणाय्रा मोठ्या कलाकारांच्या भेटीचा त्यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला.

ठळक मुद्देसिनेसृष्टीतील लोकांना बेरोजगार करण्याचा भाजपचा डाव : सतेज पाटील मुंबईसह महाराष्ट्राचा आत्मा असणारी सिनेसृष्टी संपवण्याचे कटकारस्थान

कोल्हापूर : मुंबईतील सिनेसृष्टीशी संबंधितांना बेरोजगार करण्याचे भाजपचा डाव असल्याचा खळबळजणक आरोप पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आज, बुधवारी मुंबई येथे होणाय्रा मोठ्या कलाकारांच्या भेटीचा त्यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला. पुणे पदवीधर, शिक्षक मतदार संघातील निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पेठेतील मतदान केंद्रावर भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.पालकमंत्री पाटील म्हणाले, मुंबईसह महाराष्ट्रातील चित्रपट सुष्टीला एक वेगळा इतिहास आहे. भालजी पेंढारकरांपासून ते आतापर्यंत कलाकारांनी मुंबई चित्रपट सुष्टी जिवंत ठेवण्याचे काम केले आहे. भाजपचे मात्र, मुंबईची शान असणाय्रा सिनेसृष्टीच संपवण्याचा प्रयत्न सुरु आहेत. लाखो लोकांचे रोजगार, कोट्यावधीची उलढाला या सिनेसृष्टीवर आवलंबून आहे. येथून एक कलाकार जरी बाहेर गेला तर हजारो लोकांवर परिणाम होणार आहे.

लाईटमन पासून ते निर्मात्यांपर्यंत सर्वांना बेरोजगार करण्याचा भाजपने विडा  उचलल्याची शंका निर्माण होते.महाविकास आघाडी महाराष्ट्रातील सिनेसृष्टी दुसरीकडे जावू देणार नाही. आमचे उद्योग, आमच्याच राज्यात राहिले पाहिजेत. यासाठी राज्यशासन म्हणून जे काही पावले उचलावी लागतील ती उचलू.उत्तरप्रदेशमध्ये सुविधा उपलब्ध असतील आणि तेथे कोणीही बोलवले तर मुंबईतील कलाकारांनी जाण्यास काही हरकत नाही, या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्याचाही पालकमंत्री पाटील यांनी समाचार घेतला.  गेल्या ६० वर्षापासून मुंबई सिनेसृष्टी येथे आहे. सुविधा आहे म्हणूनच येथे त्यांचा व्यवसाय सुरु आहे. चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे.

टॅग्स :Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलchandrakant patilचंद्रकांत पाटीलbollywoodबॉलिवूडMumbaiमुंबईkolhapurकोल्हापूर