शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

प्रदेशाध्यक्षांच्या निष्क्रियतेमुळे भाजप पदाधिकारी सैरभैर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:33 IST

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची निष्क्रियता स्पष्ट होत आहे. गोकुळच्या निवडणुकीत सपशेल पराभव झाल्यामुळे भाजप नेते, पदाधिकारी, ...

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची निष्क्रियता स्पष्ट होत आहे. गोकुळच्या निवडणुकीत सपशेल पराभव झाल्यामुळे भाजप नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्षांची निष्क्रियता लपवण्यासाठी पालकमंत्र्यांवर आरोप करण्याचा खटाटोप केला जात असल्याचा पलटवार सोमवारी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला.

शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, संजय पोवार वाईकर, सचिन चव्हाण, किशोर खानविलकर, संपतराव पाटील, महंमद शेख यांनी पत्रकाद्वारे सोमवारी भाजपवर टीकास्त्र सोडले. पालकमंत्री सतेज पाटील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत हे जिल्ह्यातील जनतेला अवगत आहे, त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काही सल्ले देण्याची गरज नाही, असे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

गोकुळच्या निवडणुका पालकमंत्र्यांनी नव्हे तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर घेण्यात आल्या होत्या हे भाजपच्या अंध भक्तांनी समजून घ्यावे. त्यात भाजपचे स्वयंघोषित नेते प्रचार करत नव्हते का..? की पराभवाच्या भीतीने सगळे नेते घरीच बसले होते काय? आज गोकुळबद्दल बोलणाऱ्यांनी त्यांना जाब विचारला का? अशी विचारणाही पत्रकात करण्यात आली आहे.

कोरोनाच्या लाटेत जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडून बसत आहेत. एका बाजूने कडक लॉकडाऊनची मागणी करतात आणि दुसरीकडे लॉकडाऊन काढा म्हणून दंगा करणाऱ्या भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांमुळे जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. कोरोनाच्या चाचण्या मोठ्या प्रमाणात होत असल्याने बाधितांचे आकडे समोर येत आहेत. कोल्हापुरात इतर जिल्हा व अन्य राज्यातील रुग्ण उपचार घेत असल्याने जिल्ह्याची रुग्णसंख्या वाढत आहे. जी रुग्णसंख्या आहे ती खरी आहे. गुजरात, उत्तरप्रदेशसारखी लपवाछपवी नाही. कारण भाजप शासन असणाऱ्या उत्तर प्रदेशातील गंगा नदीत हजारो कोरोना रुग्णांचे मृतदेह वाहत होते त्यावेळी कोल्हापूरची पंचगंगा नदी ही निर्मळपणे वाहत होती हे सुद्धा भाजपच्या अंध भक्तांनी समजून घ्यावे असे या पत्रकात म्हटले आहे.