शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे आंब्यात, तर महाविकास आघाडीचे सदस्य पन्हाळ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 12:30 IST

Zp Election Kolhapur : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड सोमवारी होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे चौदा सदस्य आंब्यात दाखल झाले आहेत. महाविकास आघाडीचे ४१ सदस्य शनिवारी पन्हाळ्यावर रवाना होत आहेत. कर्नाटक आणि गोव्यात आरटीपीसीआरचा निगेटिव्ह अहवाल बंधनकारक असल्याने अन्य राज्यात सहल काढण्यावर मर्यादा आल्या आहेत.

ठळक मुद्देभाजपचे आंब्यात, तर महाविकास आघाडीचे सदस्य पन्हाळ्यावरकोरोनामुळे अन्य राज्यात सहलीवर मर्यादा

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड सोमवारी होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे चौदा सदस्य आंब्यात दाखल झाले आहेत. महाविकास आघाडीचे ४१ सदस्य शनिवारी पन्हाळ्यावर रवाना होत आहेत. कर्नाटक आणि गोव्यात आरटीपीसीआरचा निगेटिव्ह अहवाल बंधनकारक असल्याने अन्य राज्यात सहल काढण्यावर मर्यादा आल्या आहेत.अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड सोमवारी असली तरी गेले चार दिवस याबाबत हालचाली सुरू झाल्या. यातूनच मग भाजपचे काही सदस्य गुरुवारी तर उर्वरित सदस्य शुक्रवारी आंब्यात दाखल झाले आहेत. महाविकास आघाडीच्या सदस्यांना शनिवारी दुपारपर्यंत पन्हाळ्यावर नेण्यात येणार आहे. याच ठिकाणी नेते रविवारी इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत.महाविकास आघाडीकडे भक्कम बहुमत आहे. परंतु अध्यक्षपद कोणाकडे यावरून काही अडचण उद्भवू नये, यासाठी सर्वांनाच पन्हाळ्यावर एकत्र ठेवण्यात येणार आहे. जनसुराज्यचे सहा सदस्य घरीच असून अन्य विरोधी आघाडीतील छोट्या गटांचे सदस्यही सहलीवर गेलेले नाहीत. बहुतांशी ठिकाणी सदस्य पत्नी असेल तर पतीच सहलीवर गेले आहेत. सोमवारी या सर्वांना कोल्हापुरात आणण्यात येणार आहे.

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर