sugarcane rate: राज्यात उच्चांकी दर देणाऱ्या कोल्हापुरातील 'या' कारखान्याने जाहीर केला यंदाचा दर, किती रुपये... वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 14:00 IST2025-11-04T13:59:34+5:302025-11-04T14:00:25+5:30
ऊस दराची उच्चांकी परंपरा कायम

sugarcane rate: राज्यात उच्चांकी दर देणाऱ्या कोल्हापुरातील 'या' कारखान्याने जाहीर केला यंदाचा दर, किती रुपये... वाचा
सरवडे : बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२६ च्या गळीत हंगामात येणाऱ्या उसाला प्रतिटन रुपये ३६१४ ऊस दर देण्याची घोषणा अध्यक्ष के.पी. पाटील यांनी केली. बिद्री कारखान्याच्या प्रधान कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही घोषणा केली.
के.पी. पाटील म्हणाले, मागील हंगामाची रिकव्हरी धरून एफआरपीप्रमाणे ऊस दर द्यावयाचा की ज्या त्या हंगामाची रिकव्हरी धरून एफआरपी ऊस दर द्यायची याबाबत सुप्रीम कोर्टात दावा प्रलंबित असल्याने बिद्रीने चालू सन २०२५-२६ साठी पहिली उचल रुपये ३४५२ जाहीर केला होता. मात्र न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पाहता शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत कारखान्याच्या ऊस दराची उच्चांकी परंपरा कायम ठेवत येत्या हंगामात उसास प्रति टन ३६१४ रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. 
यावेळी उपाध्यक्ष मनोज फराकटे, व्यवस्थापकीय संचालक आर .डी. देसाई, कार्यकारी संचालक एस. एन. घोरपडे यांच्यासह संचालक खाते प्रमुख उपस्थित होते