शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दौलत कारखान्याची निविदा अखेर रद्द

By admin | Updated: November 19, 2015 01:11 IST

प्रतिसादच मिळेना : जिल्हा बॅँकेसमोरील पेच

कोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर अथवा विक्रीची प्रसिद्ध केलेली निविदा अखेर रद्द झाली. कारखान्याच्या आर्थिक स्थितीबाबतची माहिती मागवून इच्छुक थंडच राहिल्याने ही निविदा प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे बॅँकेला निविदा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. दौलत साखर कारखान्याकडे जिल्हा बॅँकेची ६५ कोटींची थकबाकी आहे. या थकबाकीपोटी बॅँकेने कारखान्याची मालमत्ता ताब्यात घेऊन लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे. आतापर्यंत कारखाना भाडेतत्त्वावर व विक्रीबाबत आठ ते नऊ निविदा काढण्यात आल्या होत्या; पण त्याला प्रतिसादच मिळत नाही. कारखाना गेले चार हंगाम बंद आहे. हा हंगाम वाया जाऊ नये, यासाठी बॅँकेने जोरदार प्रयत्न केले होते. यासाठीच बॅँकेने पुन्हा २८ आक्टोबरला निविदा प्रसिद्ध केली होती. त्याची मुदत ७ नोव्हेंबरपर्यंत होती. कारखान्यावरील कर्जाचा बोजा किती आहे, याबाबत लेखापरीक्षणाचा अहवाल इच्छुक कंपन्यांनी मागितला होता. बॅँकेने कारखाना प्रशासनाकडे लेखापरीक्षणाचा अहवाल मागितला होता. कारखान्याने हा अहवाल दिला; पण इच्छुक कंपन्यांनी पुढे पाऊलच टाकले नाही. पाच कंपन्यांनी लेखापरीक्षणाचा अहवाल द्या, असे लेखी पत्र फक्त या कालावधीत दिले. त्यामुळे बॅँकेने ही प्रक्रिया रद्द केली आहे. (प्रतिनिधी)