शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

भोगावती नदीचे प्रदूषण उच्च न्यायालयात

By admin | Updated: December 23, 2014 00:41 IST

‘लोकमत’ची कात्रणे सादर : प्रदूषण मंडळाचे कातडी बचाव

कोल्हापूर : भोगावती नदीत दुर्गंधीयुक्त मळीमिश्रित पाणी सोडले कुणी याचा शोध घेण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळास दोन दिवसानंतरही अपयश आले. प्रदूषण मंडळ कुणाला वाचविण्यासाठी कातडी बचाव भूमिका घेत आहे का, अशी शंका त्यामुळे उपस्थित होत आहे. त्या परिसरात कोणताही उद्योग नाही तरीही पाणी प्रदूषित कसे होते याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. दरम्यान दूषित पाण्यामुळे मासे मेले यासंबंधीचे सविस्तर वृत्त ‘लोकमत’मध्ये दोन दिवस प्रसिद्ध झाले. या बातमीची कात्रणे पंचगंगा प्रदूषणाच्या सुनावणीवेळी आज, सोमवारी याचिकाकर्त्याचे वकील धैर्यशील सुतार यांनी उच्च न्यायालयात सादर केली. भोगावती नदीमध्ये हळदी बंधाऱ्यास बरगे घालून पाणी अडविले आहे. मळीमिश्रित काळे पाणी भोगावती नदीत शुक्रवारी सायंकाळनंतर बंधाऱ्यापर्यंत मिसळले. त्यामुळे पाणी प्रचंड दूषित झाले होते. परिणामी परिते, हळदी, कुरुकली, कोथळी, देवाळे, आदी गावांचा पाण्याचा प्रश्न भीषण झाला. प्रदूषित पाण्यामुळे मासे मेले. दुर्गंधी सुटली होती. फक्त ‘लोकमत’ने यावर प्रकाशझोत टाकला. याचे पडसाद उच्च न्यायालयात उमटले. दोन दिवस भोगावती नदीच्या प्रदूषणासंबंधी आलेल्या बातम्यांचे कात्रणच न्यायालयात आज सोमवारी अ‍ॅड. धैर्यशील सुतार यांनी सादर केले. प्रदूषण नियंत्रण मंडळ जाणीवपूर्वक आम्हाला काही माहिती नाही, असे म्हणत कानावर हात ठेवत आहे. राजकीय दबावापोटी संबंधित कारखान्यावर कारवाई करीत नसल्याचा आरोप करून ‘लोकमत’ने वस्तुस्थिती समोर आणली, असेही अ‍ॅड. सुतार यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने कात्रणाची काळजीपूर्वक पाहणी करीत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वकिलांकडे देण्याचे सूचित केले व यासंदर्भातही प्रदूषण नियंत्रण मंडळाने म्हणणे सादर करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राधानगरी धरणातून ६०० क्युसेक्स पाणी भोगावती नदीत सोडले आहे. हे पाणी हळदी बंधाऱ्यापर्यंत येऊन पोहोचले आहे. यामुळे दूषित पाण्यामुळे निर्माण झालेला सहा गावांतील पाणी प्रश्न निकालात निघाला आहे. राधानगरीतून पाणी आल्यामुळे दुर्गंधीयुक्त, दूषित पाणी वाहत आहे. यामुळे कोल्हापूरपर्यंत दूषित पाणी येऊन पोहोचणार आहे.दोन दिवसांनंतरही दूषित पाणी कोठून आले याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळ अनभिज्ञ आहे. यामुळे कारवाई कोणावर करणार, असे ‘प्रदूषण’चे अधिकारी म्हणत आहेत. भोगावती कारखान्यांतून मळीचे तीन टँकर कोठे गेले, याचाही शोध घेण्यात अपयश आलेले आहे.