Kolhapur: गुजरीतील बंगाली कारागीर १७ लाखांचे सोने घेऊन पळाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 18:22 IST2025-04-16T18:22:09+5:302025-04-16T18:22:29+5:30
कोल्हापूर : गुजरीतील एका सराफाकडे काम करणारा बंगाली कारागीर नजीबुल्ला औलादअली हुसेन (सध्या रा. राम गल्ली, शिवाजी मार्केट, कोल्हापूर ...

Kolhapur: गुजरीतील बंगाली कारागीर १७ लाखांचे सोने घेऊन पळाला
कोल्हापूर : गुजरीतील एका सराफाकडे काम करणारा बंगाली कारागीर नजीबुल्ला औलादअली हुसेन (सध्या रा. राम गल्ली, शिवाजी मार्केट, कोल्हापूर, मूळ रा. पश्चिम बंगाल) हा १७ लाख २० हजार रुपये किमतीचे १९७ ग्रॅम सोने घेऊन पळाला.
हा प्रकार सोमवारी (दि. १४) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडला. याबाबत सराफाकडील व्यवस्थापक हनिफ इंदिस मंडल (वय ३०, रा. राम गल्ली, शिवाजी मार्केट) यांनी मंगळवारी (दि. १५) जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नजीबुल्ला हुसेन हा गुजरीतील एका सराफाकडे कारागीर म्हणून काम करतो. सराफाने त्याला बांगड्या तयार करण्यासाठी २२ कॅरेटचे १९७ ग्रॅम सोने दिले होते. दागिने न देता तो गायब झाला आहे.
सोमवारी सकाळपासून त्याचा संपर्क होत नाही. राम गल्ली येथील राहण्याच्या ठिकाणीही तो नाही. त्याचा मोबाइल बंद असल्याने सराफाकडील व्यवस्थापकाने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.