यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेचा लाभ द्या : राजेंद्र सूर्यवंशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:26 IST2021-02-09T04:26:33+5:302021-02-09T04:26:33+5:30

कोल्हापूर : यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेचे प्रस्ताव लॉकडाऊनमुळे प्रलंबित आहेत. संबंधित लाभार्थ्यांना योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी करवीर पंचायत ...

Benefit from Yashwantrao Chavan Gharkul Yojana: Rajendra Suryavanshi | यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेचा लाभ द्या : राजेंद्र सूर्यवंशी

यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेचा लाभ द्या : राजेंद्र सूर्यवंशी

कोल्हापूर : यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेचे प्रस्ताव लॉकडाऊनमुळे प्रलंबित आहेत. संबंधित लाभार्थ्यांना योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी करवीर पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र सूर्यवंशी यांनी समाजकल्याणचे साहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांच्याकडे केली.

यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेतून धनगर, भोई, वडार शिकलगार, आदी भटक्या समाजाला घरबांधणीसाठी लाभ दिला जातो. या योजनेतून १ लाख २० हजार, रोजगार हमीतून १७ हजार, तर शौचालयासाठी १२ हजारांचा लाभ मिळतो. मार्च २०२० मध्ये करवीर तालुक्यातील ९० प्रस्ताव पाठविले होते. मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले. त्यात निधी नसल्याने हे प्रस्ताव प्रलंबित राहिले. यावर्षी या प्रस्तावांना तातडीने मंजुरी देऊन संबंधितांना लाभ द्यावा, अशी मागणी राजेंद्र सूर्यवंशी यांनी केली. त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण व रमाई आवास योजनेसाठी एक वर्षापूर्वी काढलेले उत्पन्नाचे दाखलेच ग्राह्य मानावेत, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी बेलेचे माजी सरपंच राजेंद्र कारंडे, केर्लीचे सदस्य सचिन माने, आदी उपस्थित होते.

फोटो -

यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेचा लाभ द्यावा, या मागणीचे निवेदन समाजकल्याणचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांना देण्यात आले. यावेळी राजेंद्र सूर्यवंशी, सचिन माने, राजेंद्र कारंडे उपस्थित होते. (फोटो-०८०२२०२१-कोल-यशवंतराव चव्हाण)

Web Title: Benefit from Yashwantrao Chavan Gharkul Yojana: Rajendra Suryavanshi