शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बनारसची शस्त्रे साताऱ्यात

By admin | Updated: October 10, 2014 22:59 IST

दोघांना अटक : दोन पिस्तुले, एक रिव्हॉल्व्हर जप्त

सातारा : बनारसहून साताऱ्यात शस्त्रांची तस्करी होत असल्याचे उघडकीस आले असून, स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन पिस्तुले, एक रिव्हॉल्व्हर आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.अखिलेश उदयप्रताप सिंग-राजपूत (वय २२, मूळ रा. लक्ष्मणपूर पो. चोचकपूर, जि. गाजीपूर, राज्य उत्तरप्रदेश, सध्या रा. वाठार स्टेशन, ता. कोरेगाव), नवनाथ नामदेव निकम (वय २०, रा. शेरेचीवाडी, ता. फलटण) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. वाढे फाट्यावरील एका हॉटेलजवळ एक युवक शस्त्रे विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना तेथे तत्काळ रवाना केले. त्यावेळी अखिलेशला त्यांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि एक रिव्हॉल्व्हर, तीन जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली.नवनाथ निकम हा शेरेचीवाडी, (ता. फलटण) येथील जोतिबा मंदिराच्या परिसरात कोणाला तरी शस्त्र विकण्यासाठी आला होता. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे धाव घेऊन त्याला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल, एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. या दोघांकडील शस्त्रांची किंमत २ लाख ५५ हजार रुपये आहे. हे दोघेही शस्त्रांची तस्करी करत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर येत आहे.या दोन्ही कारवायांमध्ये पोलीस उपनिरीक्षक शामराव मदने, अनंत चिंचकर, हवालदार पृथ्वीराज घोरपडे, संजय पवार, दीपक मोरे, संजय शिंदे, कांतिलाल नवघणे, विजय कांबळे, प्रवीण फडतरे, प्रवीण शिंदे, राहुल कणसे, विक्रम पिसाळ, नितीन शेळके, मुबीन मुलाणी, शरद बेबले, नितीन भोसले, महेश शिंदे, अमित घाटे, संजय वाघ यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)शस्त्रे घेणारे कोण...शस्त्रांची तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी पकडल्यानंतर आरोपींकडून अद्याप समाधानकारक माहिती उघड झाली नाही. ते दोघे कोणाला शस्त्र विकणार होते. त्यांचा नेमका व्यवहार किती रुपयांना ठरला होता, हे तपासात समोर आल्यानंतरच शस्त्रे घेणारे कोण, हे उघड होईल, असे पोलिसांनी सांगितले.