शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

गौणखनिज उत्खननास आठ दिवसांत सुरुवात

By admin | Updated: December 16, 2014 23:49 IST

ज्ञानेश्वर खुटवड : जिल्हा बैठकीत मंजुरी मिळणार

सिंधुदुर्गनगरी : मुंबई उच्च न्यायालयाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंदी कायम केलेल्या २५३ गावे वगळता सिंधुदुर्गातील अन्य गावांतील गौणखनिज उत्खनन परवानगीची प्रक्रिया जिल्हा महसूल प्रशासनाने सुरू केली आहे. गुरुवारी होणाऱ्या जिल्हास्तरीय बैठकीमध्ये येणाऱ्या प्रस्तावांना मंजुरी दिली जाणार असून, येत्या आठ दिवसांत गौणखनिज उत्खननास अधिकृतपणे सुरुवात होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी दिली.गौणखनिज बंदीमधून जिल्ह्यातील काही गावांना उच्च न्यायालयाने वगळून या गावांत गौणखनिज उत्खननास परवानगी दिली होती. हा निर्णय आता सिंधुदुर्ग महसूल प्रशासनाकडे प्राप्त झाल्याने प्रशासनाने गौणखनिज उत्खनन परवानगी सुरू केली आहे.दोडामार्ग तालुक्यात ५९ गावे असूनही सर्वच्या सर्व गावे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंदी आदेशात समाविष्ट झाली आहेत, तर कस्तुरीरंगन समितीच्या अहवालात इको-सेन्सिटिव्ह म्हणून समाविष्ट असलेली १९२ गावे बंदी आदेशात आहेत. ही गावे वगळता प्रशासनाने अन्य गावांतील चिरे, काळा दगड, आदी गौणखनिज उत्खननास परवानगी देण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. बंदी उठलेल्या गावांमधील गौणखनिजाचे प्रस्ताव सादर करावेत, असे तलाठ्यांना आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती असून, या समितीसमोर जे प्रस्ताव येतील, त्यांना या सभेत मान्यता देण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित खाण व्यवसायाकडून महसूल भरून घेण्यात येणार आहे आणि त्यानंतर येत्या आठ दिवसांत अधिकृत उत्खननास सुरुवात होणार आहे. बांधकाम व्यवसायाला मिळणार उभारी खडी, चिरे, आदी खनिज बंदीमुळे विकासावर मोठा परिणाम झाला होता. (प्रतिनिधी)