शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

सावधान ! ‘व्हॉटस् अ‍ॅप’ हाताळताय...--सिंहावलोकन

By admin | Updated: October 7, 2014 00:02 IST

आक्षेपार्ह मजकूराबाबत नोटीस येईल

एकनाथ पाटील -- कोल्हापूर --विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काही उमेदवारांविरोधात ‘व्हॉट्स अ‍ॅप’वरून बदनामीकारक, आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला जात आहे. दोन्ही गटांत तेढ निर्माण होत आहेत. अशा प्रवृत्तीला चाप लावण्यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. अशा मजकुरासंबंधी तक्रार दाखल झाल्यास संबंधित व्यक्तींवर फौजदारी दंड प्रक्रिया संहिता ‘कलम १४९’ प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई केली जाणार आहे. निवडणुकीत उमेदवाराच्या प्रचाराच्या तोफा धडाडू लागल्या. ‘हायटेक प्रचार प्रणाली’ म्हणून ‘व्हॉट्स अ‍ॅप’ आणि ‘फेसबुक’चा वापर होत आहे. फेसबुकवरून प्रसारित होणारी अनेक वादग्रस्त छायाचित्रे आणि संदेशांमुळे यापूर्वी राज्यात दंगली घडल्या आहेत. आता तरी मोबाईलवरील ‘व्हॉट्स अ‍ॅप’ने प्रत्येकाला वेड लावले. कुणी टाइमपास म्हणून, तर कुणी व्यवसायासाठी त्याचा वापर करीत आहे. परंतु चांगल्यासाठी कमी आणि गैरकृत्यांसाठी जास्त असा वापर होऊ लागल्याचे सध्याचे चित्र आहे. आता थेट मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वाचा ‘व्हॉट्स अ‍ॅप’ प्रचारयंत्रणेकडून वापर सुरू आहे. लोकांचे मतपरिवर्तन करण्यासारखे संदेश व छायाचित्र पाठविले जात आहेत; तर दुसरीकडे विरोधी उमेदवाराला चितपट करण्याच्या दृष्टीने संदेश तयार करून तो प्रसारित केला जाऊ लागला आहे. त्यातून वादावादीचे प्रसंग उद्भवू लागले आहेत. विनोदी मजकूरातूनही उमेदवारांची बदनामी करणारा मजकूर छायाचित्रासह प्रसारित केला गेला आहे. आमदार नरके यांची बदनामी : अज्ञातावर गुन्हा पन्हाळा तालुक्यातील कळे (खेरिवडे) येथे बालिकेवरील अत्याचार प्रकरण आमदार चंद्रदीप नरके यांनी मध्यस्थी करून दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवून त्यांच्याविरोधात ‘व्हॉट्स अ‍ॅप’वरून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला होता. नरके यांचे कार्यकर्ते अभिजित हावळ यांनी याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात फिर्याद दिली आहे. पोलीस पाठवणार अशी नोटीस आपल्या ‘व्हॉट्स अ‍ॅप’ अकौंटमार्फत इतर लोकांचे ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला आहे. इकडील पोलीस ठाण्यात तक्रार प्राप्त आहे. सद्या आक्षेपार्ह मजकुरामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. तरी ‘व्हॉट्स अ‍ॅप’ सदस्यांमार्फत असा आक्षेपार्ह मजकूर अथवा चित्र प्रसारित केल्यास सदस्यांना सर्वस्वी जबाबदार धरुन आपणाविरुद्ध कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.’ ‘व्हॉट्स अ‍ॅप’चा चांगला कामांसाठी वापर न होता आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करण्यासाठी त्याचा गैरवापर होऊ लागला आहे. एखाद्याने तक्रार दिल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जाईल. - डॉ. मनोजकुमार शर्मा(पोलीस अधीक्षक)