शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पांच्या स्वागतास बाजारपेठा सजल्या

By admin | Updated: September 3, 2016 00:55 IST

नारळांचीही आवक वाढली

गणेशोत्सव : नारळ, कापूर, उदबत्ती, दूर्वा, फुले, गेदा वस्त्रासह गौरी-शंकराचे मुखवटे, सुका मेव्याची दुकाने थाटलीकोल्हापूर : अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. घरगुती गणेशमूर्तीला आरास करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीला वेग आला आहे. यात तयार थर्माकोल शिखरे, मखर, पूजेसाठी नारळ, कापूर, उदबत्ती, दूर्वा, फुले, गेदा वस्त्रासह गौरी-शंकराचे मुखवटे व तयार मूर्ती, शोभिवंत माळा, पाच फळे आणि प्रसादाला सुका मेवा, मिठाई, आदींच्या खरेदीसाठी बाजारात शुक्रवारी मोठी लगबग दिसत होती. यंदा डॉल्बीला मर्यादा असल्याने मंडळे पारंपरिक बॅँड व अन्य वाद्यांकडे वळू लागली आहेत.शहरातील महाद्वार रोड, पापाची तिकटी, बाजारगेट, पानलाईन, न्यू महाद्वार रोड, मिरजकर तिकटी, राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, टिंबर मार्केट, शिंगोशी मार्केट या सर्व बाजारपेठा गर्दीने अक्षरश: फुलल्या आहेत. नारळांचीही आवक वाढली गणेशोत्सव काळात तमिळनाडूहून १५० ते २०० ट्रक नारळांची आवक झाली आहे. प्रत्येक ट्रकमध्ये ३५ हजार नारळ असतात. एकूण २०० ट्रकचा विचार करता ७० लाखांहून अधिक नारळांची आवक होते. यामध्ये प्रामुख्याने घरगुती गणेशाच्या आगमन व विसर्जनामध्ये नैवेद्यात नारळाचे मोदक, तर सार्वजनिक मंडळांमध्ये नवसासाठी नारळाची तोरणे लागतात. विशेषत: नवा, जुना, कंगणार, बोळ, या जातींचे नारळ विक्रीसाठी येतात. गलाटा, शेवंता, अ‍ॅस्टरची मागणी वाढलीगणरायाच्या स्वागतापासून ते अगदी विसर्जनाच्या उत्तरपूजेपर्यंत हार, फुले यांना मागणी असते. विशेषत: मिरची फूल, गलाटा, शेवंती, कर्दळफूल, गुलाबाचे फूल, अ‍ॅस्टर, तुळस यांची आवकही मोठ्या प्रमाणात होते.सणाचा उत्साह सुगंधी फुलांमुळे आणखी फुलतो. गलाटा, गौर, शेवंती, मिरची फूल, गुलाब, अ‍ॅस्टर, आदी फुलांना गणेशोत्सवाच्या काळात मोठी मागणी असते. दरही ३० ते १०० रुपये प्रतिकिलो आहे.- शोभा कुंभार, फूल व्यापारी