शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election 2026: ‘करेक्ट’ कार्यक्रमावरून जुंपली, महायुती-काँग्रेस भिडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 12:46 IST

..तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम केला असता - सतेज पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका जिंकल्यानंतर महायुतीकडून कॉंग्रेसला मोठ्या फलकाद्वारे डिवचण्यात आले आहे. ‘धन्यवाद कोल्हापूरकर, कॉंग्रेसचा करेक्ट कार्यक्रम केलात’ असा मजकूर आणि महायुतीच्या नेत्यांची छायाचित्रे असलेले मोठमोठे फलक कोल्हापूरमध्ये उभारण्यात आले आहेत. यावर कॉंग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनीही वेगवेगळे लढला असता तर कोल्हापूरच्या जनतेने तुमचाच ‘करेक्ट’ कार्यक्रम केला असता असे प्रत्युत्तर सोमवारी दिले आहे.गतवेळची विधानसभा, चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतरची पोटनिवडणूक आणि नंतरची लोकसभा या तीनही निवडणूका कॉंग्रेसने सलग भाजप, शिंदेसेनेला चितपट केले होते. लोकसभेला देखील शाहू छत्रपती यांच्या माध्यमातून कॉंग्रेसने मास्टर स्ट्रोक मारत ही जागा खेचून घेतली.

वाचा: कोल्हापुरात काँग्रेस-शिंदेसेना एकत्र येणार ?; सतेज पाटील म्हणाले, बंददाराआडची चर्चा जाहीर कशी करू

मात्र त्यानंतर कोल्हापूरच्या दोन्ही विधानसभेच्या जागा भाजप, शिंदेसेनेने पटकावल्या. त्यानंतर महायुतीसाठी कोल्हापूर महापालिका महत्त्वाची होती. त्यामध्ये यश मिळवल्यानंतर मात्र ‘मनात तेच मनपात’ या फलकांच्याही पुढे जाऊन महायुतीने कॉंग्रेसला करेक्ट कार्यक्रम झाल्याचे फलक लावून डिवचले आहे.

आम्ही कोणताही चुकीचा फलक लावलेला नाही. कोल्हापूरच्या जनतेने महायुतीला निर्णायक असे बहुमत दिले आहे. कोल्हापूर महापालिकेच्या इतिहासात भाजपला सर्वाधिक जागा पहिल्यांदा मिळाल्या आहेत. त्यामुळेच जनतेनेच कॉंग्रेसचा जो करेक्ट कार्यक्रम केला त्याबद्दल आम्ही एकदा नाही हजारदा कोल्हापूरकरांचे आभार मानू. त्याला कोणी आक्षेप घेण्याची गरज नाही. - खासदार धनंजय महाडिक

वेगवेगळे लढला असता तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम केला असता, सतेज पाटील यांचा पलटवार कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र लढले, ते वेगवेगळे लढले असते तर कोल्हापूरकरांनी महायुतीचाच करेक्ट कार्यक्रम केला असता, या शब्दांत काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी महायुतीच्या पोस्टरबाजीवर पलटवार केला. ‘धन्यवाद कोल्हापूरकर.. काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम केलात!’ अशी बॅनरबाजी महायुतीने शहरभर करून काँग्रेसला डिवचले आहे. त्यावर आमदार पाटील यांनी “वेगळे लढला असता तर तुमचाच कार्यक्रम केला असता,” असे प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, “महायुतीने वेगवेगळे लढायला हवे होते. तुमची एवढी ताकद होती तर वेगवेगळे का लढला नाही. आमचे पाच उमेदवार पाचशेच्या आत मतांनी पराभूत झाले आहेत. त्यामुळे कोल्हापुरात महायुतीचा तांत्रिक विजय झाला आहे. जे चांगले आहे त्याला पाठिंबा असेल. मात्र, चुकीचे असेल तर त्यावर लक्ष असेल. आमचा ३५ चा आकडा मोठा आहे, त्यामुळे सत्ताधाऱ्यांना तितकं सोपं नाही, असा इशाराही आमदार पाटील यांनी दिला.अडीच-अडीच वर्षे महापौर कराकोल्हापुरात महायुतीला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे हिंमत असेल तर त्यांनी अडीच-अडीच वर्षे महापौर करावा, असे आव्हानही त्यांनी दिले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Election: Alliance taunts Congress; Patil retorts with solo fight challenge.

Web Summary : After Kolhapur's municipal victory, the ruling alliance mocked Congress with banners. Congress leader Satej Patil retorted, suggesting the alliance would have lost if they'd contested separately. He challenged them to split the mayoral term.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Mahayutiमहायुतीcongressकाँग्रेस