शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

बांबवडेत आरोग्य केंद्रास टाळे

By admin | Updated: June 16, 2015 01:16 IST

वैद्यकीय अधिकाऱ्यांची मागणी : ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन

बांबवडे : बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नेमावा या मागणीसाठी बांबवडे ग्रामस्थांच्यावतीने कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर रास्ता रोको करून आरोग्य केंद्रास टाळे ठोकण्यात आले. यानंतर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी विजय नांद्रेकर यांच्या लेखी आश्वासनानंतर रास्ता रोको स्थगित करून आरोग्य केंद्राचे टाळे काढण्यात आले.शाहूवाडी तालुक्यातील मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या बांबवडे येथील आरोग्य केंद्रात दररोज १०० ते १२५ रुग्णांची तपासणी होते. परंतु येथील वैद्यकीय अधिकारी पुढील शिक्षणासाठी गेल्याने आठवड्यापासून येथे डॉक्टर नाहीत. यानंतर लगेच दुसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती केली. तेही मेडिकल रजेवर गेले. पुन्हा सरूड वैद्यकीय केंद्राच्या अधिकाऱ्याकडे दोन्ही केंद्राचा पदभार दिला. अशा परिस्थितीमुळे येथील रुग्णांची गैरसोय होत आहे.यामुळे सरपंच विष्णु यादव यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी शासकीय यंत्रणेला निवेदन देऊन डॉक्टरांची मागणी केली. मागणी योग्यरित्या मान्य न झाल्याने सोमवारी ग्रामस्थांनी आरोग्य केंद्रास टाळे ठोकून रास्ता रोको आंदोलन केले. वैद्यकीय विभागाने याची बराच वेळ दखल न घेतल्याने वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची स्थिती निर्माण झाल्याने पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी संयमाने परिस्थिती नियंत्रणात आणली.सरपंच यादव यांच्यासह ग्रामस्थांनी जोपर्यंत कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी या केंद्रास मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका घेतली. यानंतर डॉ. विजय नाडेकर यांनी येऊन डॉ. भंडारी यांची मंगळवारी (दि. १६) पासून प्रतिनियुक्तीवर नेमणूक करत असल्याचे व तालुका वैद्यकीय अधिकारी रजेवरून परत येताच कायमस्वरूपी डॉक्टर नेमण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले व ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.या आंदोलनात पंचायत समिती सभापती पंडितराव नलवडे, उपसरपंच गजानन निकम, रवींद्र फाटक, महादेव पाटील-आवळकर, चंद्रप्रकाश पाटील व ग्रामस्थ सहभागी झाले होते.