शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

बर्ड फ्लू आजारासंबंधी पालिकेत प्रबोधन कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:20 IST

कोल्हापूर : विविध राज्यांत पसरत असलेल्या बर्ड फ्लू आजाराच्या संक्रमणाच्या धर्तीवर बुधवारी कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विक्रेते, दुकानदार, ...

कोल्हापूर : विविध राज्यांत पसरत असलेल्या बर्ड फ्लू आजाराच्या संक्रमणाच्या धर्तीवर बुधवारी कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विक्रेते, दुकानदार, पुरवठादार, व्यापारी यांनी घ्यावयाच्या दक्षतेबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रशिक्षण कार्यशाळेचे प्रास्ताविक महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील यांनी केले. यानंतर महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. सॅम लुद्रीक यांनी बर्ड फ्लू आजाराचा प्रसार, संक्रमणाचे विविध टप्पे, संक्रमित पक्ष्यांमध्ये दिसून येणारी लक्षणे, इत्यादींबाबत माहिती दिली. शहरातील विक्रेत्यांनी दुकानांची सोडियम हायपोक्लोराईडद्वारे स्वच्छता करावी, वैयक्तिक स्वच्छता, हॅण्डग्लोव्हज, मास्क व टोपी वापरावी, पक्षी ठेवण्याचे पिंजरे व वाहने निर्जंतुक करावीत याबाबत माहिती दिली. कोणत्याही स्थितीत या आजाराबाबत नागरिकांमध्ये अफवा पसरणार नाहीत याबाबत दक्षता घेणे व शहरातील नागरिकांमध्येही प्रबोधन करण्याचे आवाहन केले.

महापालिकेच्या कत्तलखान्यामध्ये सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध केलेल्या असून कोल्हापूर महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील यांनी दुकानदार यांना परस्पर दुकानामध्ये बकरी न कापता बापट कॅम्प कत्तलखाना येथे कापण्यासाठी विनंती केली. शहरातील स्थलांतरित पक्षी येणाऱ्या ठिकाणांवर लक्ष ठेवणे, मृत पक्षी आढळल्यास त्याला कोणत्याही स्थितीत स्पर्श न करता महापालिका अथवा पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयास कळवावे, असे आवाहन त्यांनी केले. माहिती शिक्षण व संवाद अधिकारी नीलेश पोतदार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.