आजऱ्यात तरुणाचा मानेवर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:23 IST2021-05-16T04:23:22+5:302021-05-16T04:23:22+5:30

नितीन हा गेली दहा वर्षे आजऱ्यात राहतो. तो खिडकी व दरवाजांच्या स्लाइडिंगचे काम करतो. दारूच्या व्यसनामुळे त्याचे पत्नीशी ...

Attempted suicide by stabbing a young man in the neck with a blade | आजऱ्यात तरुणाचा मानेवर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न

आजऱ्यात तरुणाचा मानेवर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न

नितीन हा गेली दहा वर्षे आजऱ्यात राहतो. तो खिडकी व दरवाजांच्या स्लाइडिंगचे काम करतो. दारूच्या व्यसनामुळे त्याचे पत्नीशी नेहमी भांडण होत असे. भांडणातून अनेक वेळा त्याने पत्नीला मारहाण केली आहे. हे प्रकरण पोलीस ठाण्यालाही गेले. पोलिसांनी दोघांनाही समजावून सांगून घरी पाठविले होते. शुक्रवारी (दि. १४) दिवसभर नितीन हा दारूच्या नशेत होता. सायंकाळी सहाच्या दरम्यान तो बाजारपेठेतील एका दुकानाच्या पायरीवर बसला होता. दारूच्या नशेतच नितीनने आपल्या मानेवर ब्लेडने वार करून घेतले व रक्तबंबाळ अवस्थेत तो घरी जात असताना रस्त्यावर पडला. तातडीने याची माहिती मिळताच पोलीस हेडकॉन्स्टेबल विशाल कांबळे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्वरित त्याला रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र नितीनच्या मानेची शीर तुटलेली असल्याने त्याला तातडीने कोल्हापूर येथे पाठविण्यात आले. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष गस्ती करीत आहेत.

फोटोकॅप्शन - १५ नितीन वोहाळ

स्वत:च्या मानेवर वार करून रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला नितीन वोहाळ.

Web Title: Attempted suicide by stabbing a young man in the neck with a blade