शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
3
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
4
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
5
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
6
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
7
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
8
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
9
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
10
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
12
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
13
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
14
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
15
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
16
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
17
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
18
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
19
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
20
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार

पोलीस अधीक्षक कार्यालय आवारात एकाच आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 10:51 AM

Crime News Kolhapur- मालमत्तेचा वाद व अवैधरित्या सुरू असलेल्या मद्यविक्रीची दखल न घेतल्याने गोकुळ शिरगाव येथील एकाने शनिवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक कार्यालय आवारात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. भीमराव करवते (रा. गोकुळ शिरगाव, ता. करवीर) असे त्यांचे नाव आहे. तेथील पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

ठळक मुद्देपोलीस अधीक्षक कार्यालय आवारात एकाच आत्मदहनाचा प्रयत्न अंगावर घेतले रॉकेल ओतून : मालमत्ता वादाची दखल न घेतल्याने कृत्य

कोल्हापूर : मालमत्तेचा वाद व अवैधरित्या सुरू असलेल्या मद्यविक्रीची दखल न घेतल्याने गोकुळ शिरगाव येथील एकाने शनिवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक कार्यालय आवारात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. भीमराव करवते (रा. गोकुळ शिरगाव, ता. करवीर) असे त्यांचे नाव आहे. तेथील पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.गोकुळ शिरगाव येथे भीमराव करवते हे कुटुंबीयासह राहतात. काही वर्षांपूर्वी त्यांनी भाऊ बाबूराव करवते यांच्या मदतीने गोकुळ शिरगावमधील मालमत्ता खरेदी केली होती. तेथे बार सुरु केला होता. कालांतराने दोन्ही भावात वाद झाल्याने भीमराव यांना बाजूला करुन त्याचे भाऊ बाबूराव करवते यांनी सर्व मालमत्ता ताब्यात घेतली. तेथे बेकायदेशीर मद्यविक्रीचा व्यवसाय सुरु केला.

याबाबत भीमराव करवते यांनी कारवाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागात अर्ज पाठवला होता. पण त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्याने संतप्त झालेले भीमराव करवते हे शनिवारी दुपारी मुलगा स्वप्नील सह पोलीस अधीक्षक कार्यालयात गेले. तेथे त्यांनी सोबत आणलेले रॉकेल अंगावर ओतून घेतले. त्यावेळी ते स्वत:ला पेटवून आत्मदहन करण्याच्या प्रयत्नात असताना कार्यालयातील महिलांनी व मुलाने त्यांना आडवले. त्यानंतर पोलीस कॉ. सागर माने, उमेश कांबळे यांनी त्यांना ताब्यात घेऊन शाहुपूरी पोलीस ठाण्यात आणले. आत्मदहनाचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर