Kolhapur Crime: गतिमंद युवतीवर अत्याचाराचा प्रयत्न; नराधमास महिलांनी पकडले, नागरिकांनी बेदम चोपले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 18:12 IST2025-12-09T18:10:47+5:302025-12-09T18:12:07+5:30
मुलांना घराबाहेर सोडायचे की नाही या काळजीने पालक चिंतेत

Kolhapur Crime: गतिमंद युवतीवर अत्याचाराचा प्रयत्न; नराधमास महिलांनी पकडले, नागरिकांनी बेदम चोपले
दिंडनेर्ली: पेरू खायला देऊन उसाच्या फडात नेऊन ३४ वर्षीय गतिमंद युवतीवरती लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमास चार ते पाच महिलांनी धाडसाने पकडले. संतप्त झालेल्या महिलांनी व नागरिकांनी या नराधमास बेदम चोप देऊन करवीर पोलिसांच्या ताब्यात दिले.
यावेळी त्याच्या दुचाकीची ही तोडफोड केली. आज, मंगळवारी दुपारी ही घटना घडली. काही दिवसापुर्वीच एका चिमुकलीवरही अत्याचाराचा प्रयत्न झाला होता. आज, पुन्हा ही घटना समोर आल्याने कात्यायनी परिसर हादरला. तर लहान मुलांना घराबाहेर सोडायचे की नाही या काळजीने पालक भयभयीत झाले आहेत.
आरोपी हा कर्नाटक राज्यातील कारवार परिसरातील असून तो सध्या कागल तालुक्यात गवंडी काम करत राहत असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.