Kolhapur Crime: आत्महत्या म्हणत खून दडपण्याचा प्रयत्न; मुलाच्या जबाबाने सत्य उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 12:04 IST2026-02-11T12:04:10+5:302026-02-11T12:04:36+5:30

वाघुर्डे येथील विवाहितेच्या मृत्यूचा तपास

Attempt to cover up murder by calling it suicide in Waghurde Kolhapur The truth is revealed by the child's statement | Kolhapur Crime: आत्महत्या म्हणत खून दडपण्याचा प्रयत्न; मुलाच्या जबाबाने सत्य उघड

Kolhapur Crime: आत्महत्या म्हणत खून दडपण्याचा प्रयत्न; मुलाच्या जबाबाने सत्य उघड

कळे : वाघुर्डे (ता. पन्हाळा) येथील कविता प्रदीप रावण (वय २८) या विवाहितेचा मृत्यू सुरुवातीला आत्महत्या असल्याचे दाखविण्यात आले होते. मात्र, सखोल तपासाअंती ही आत्महत्या नसून गळा दाबून खून केल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना २ जानेवारीला घडली होती.

घटनेनंतर कविता यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक नोंद करण्यात आली होती. मात्र, हा मृत्यू संशयास्पद असून आत्महत्येचा बनाव रचण्यात आल्याचा आरोप मयत महिलेच्या नातेवाइकांनी केला होता. त्यानुसार पोलिस अधीक्षकांकडे तक्रार देण्यात आली होती.

पोलिसांनी केलेल्या तपासात मयत कविता रावण यांच्या अल्पवयीन मुलाने दिलेल्या जबाबामुळे प्रकरणाला निर्णायक वळण मिळाले आहे. मुलाने दिलेल्या जबाबात सांगितले की, घटनेच्या दिवशी त्याच्या आई-वडिलांमध्ये जोरदार भांडण झाले होते. त्यादरम्यान कविता दोन वेळा घराबाहेर रस्त्यावर गेल्या होत्या. त्यानंतर पती प्रदीप रावण याने तिला जबरदस्तीने घरात ओढून आणले.

मुलाने सांगितले की, त्यावेळी “कविताला मारू नका” असे आजी म्हणत होती. घटनेच्या वेळी घरात पती प्रदीप, आजोबा, आजी, काका, सख्खी चुलत बहीण व काकी उपस्थित होते. हा अल्पवयीन मुलगा या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असून, त्याने कविता रावण यांचा गळा दाबून मारहाण केल्याचे सांगितले आहे.

तपासात कविता यांना सासरा बाजीराव रावण, दीर प्रकाश रावण, जाऊ प्रियांका रावण व पती प्रदीप रावण यांच्याकडून शारीरिक व मानसिक छळ सहन करावा लागत असल्याचेही समोर आले आहे. यापूर्वीही या छळप्रकरणी पंच व कळे पोलिस ठाण्यात सामोपचाराने तडजोड करण्यात आली होती.

नातेवाईकांची तक्रार

सासरी झालेल्या छळाच्या घटनांचा संदर्भ देत हा मृत्यू आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप करत मयत कविता यांचे वडील सुरेश शिवराम हिर्डेकर यांच्यासह माहेरच्या नातेवाइकांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दिली होती. त्याअनुषंगाने सहायक पोलिस निरीक्षक दीपक कदम यांनी प्रकरणाचा सखोल तपास केला. अल्पवयीन मुलाच्या जबाबासह इतर पुरावे व साक्षींच्या आधारे ही आत्महत्या नसून गळा दाबून खून केल्याचा संशय बळावला असून, त्यादृष्टीने पुढील तपास सुरू आहे.

Web Title : कोल्हापुर: आत्महत्या के रूप में छिपाया गया खून; बेटे के बयान से खुला राज।

Web Summary : कोल्हापुर के वाघूडे में, एक महिला की मौत जिसे शुरू में आत्महत्या माना गया था, हत्या थी। उसके बेटे के बयान से पता चला कि उसे उसके पति के साथ लड़ाई के दौरान जबरन घर लाया गया था। परिवार पर उत्पीड़न का आरोप है, जिससे पुलिस जांच हो रही है।

Web Title : Kolhapur: Murder disguised as suicide; son's statement reveals truth.

Web Summary : In Vaghude, Kolhapur, a woman's death initially ruled suicide was murder. Her son's statement revealed she was forced home during a fight with her husband. The family is accused of harassment, leading to a police investigation.