शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

एटीएमची सुरक्षा धोक्यात

By admin | Updated: August 20, 2015 21:54 IST

बँकांची बेपर्वाई : अनेक ठिकाणी सुरक्षारक्षकच नाहीत

श्रीकांत चाळके - खेड शहर आणि परिसरात बहुतांश बँकांच्या एटीएमला सुरक्षाकवच नाही. बँकांच्या या हलगर्जीपणाचा अनेक पटीने पोलिसांना त्रास भोगावा लागत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक ठिकाणच्या चोऱ्या आणि रत्नागिरीतील बँकेमध्ये झालेल्या दरोडा प्रकरणानंतरही या बँका काहीही शिकल्या नसल्याचेच दिसून येत आहे.तीनबत्ती नाका आणि बसस्थानक परिसरातील बहुतेक एटीएम सुरक्षारक्षकांअभावी असुरक्षित असल्याचे भयावह सत्य नुकत्याच केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.़ बँकांची ही हेळसांड ग्राहकांच्या माथी पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे़जाकादेवी येथील सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या शाखेवर पाचजणांनी दरोडा घालून रोकड लांबविल्याची घटना २८ नोव्हेंबर २०१३ दरम्यान घडली होती़ या घटनेपासून खेडमधील बँकांनी काहीही बोध अद्याप घेतलेला नसल्याचेच दिसून येत आहे. या दरोड्यानंतर लागलीच जिल्हाधिकारी आणि बँक प्रशासनानेही आपापल्या एटीएममध्ये सुरक्षारक्षक नेमण्याची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन दिले होते.़ मात्र, या आश्वासनाला अक्षरश: हरताळ फासण्यात आला आहे.बँकांची एटीएम सेंटर्स रत्नागिरीत जास्त प्रमाणात आहेत. मात्र, या तुलनेत खेडमध्येदेखील दोन आकडी संख्या ही एटीएमची आहे. ही एटीएम सेंटर्स किती सुरक्षित आहेत, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. बँकांच्या एटीएमची खेडमधील काय स्थिती आहे, याबाबत माहिती घेतली असता ही वस्तुस्थिती समोर आली आहे.तीनबत्ती नाका परिसरात स्टेट बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये सुरक्षारक्षक आहे तर बसस्थानक परिसरातील बँक आॅफ इंडियाच्या सेंटरमध्येही सुरक्षारक्षक नेमण्यात आला आहे. मात्र उर्वरित बँकांमध्ये सेंट्रल बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीबीआय, बँक आॅफ बडोदा, सिंडीकेट बँक, बँक आॅफ महाराष्ट्र तसेच इतर बहुतेक राष्ट्रीयकृत बँकांच्या एटीएम सेंटर्समध्ये सुरक्षा रक्षक नाही़ याचा परिणाम ग्राहकांच्या सुरक्षिततेवर होत आहे.सायंकाळी तसेच रात्रीच्यावेळी महिलांनाही आता एटीएममधून पैसे अथवा कागदपत्रे पाहता येणे शक्य होत नाही़ अशावेळी संघर्ष किंवा खटके उडण्याची शक्यता असते. या एटीएममध्ये कोणीही घुसले, तरी त्याचा बँकांना पत्ताच नसतो. काही एटीएम सेंटर्समध्ये उभारलेली सीसीटीव्हीची यंत्रणाही बंदच आहे. त्यामुळे याठिकाणी सुरक्षा रामभरोसेच आहे.खेडमधील काही सेंटर्सच्या दरवाजांना लॉक असायचे. ही लॉकिंग यंत्रणा ज्या व्यक्तीला एटीएममध्ये जायचे असेल त्याला एटीएम कार्डद्वारे खोलल्यावरच आत जाता येत होते.़ एटीएम सेंटर्सची ही अशीच स्थिती राहिली तर होणाऱ्या परिणामांना बँकांनाच जबाबदार धरण्यात आले पाहिजे. यासाठी बँकांनीच सुरक्षा रक्षक नेमणे आवश्यक आहे, अशी मागणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)सीसीटीव्हीही बंद?रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी येथे भर दिवसा पडला होता बँकेवर दरोडा.बँकांनी सुरक्षा ठेवण्याचे केले होते मान्य.बैठकीतील आदेशाची अद्यापही अंमलबजावणी नाही.खेडमधील तीनबत्ती नाका, बसस्थानक परिसरातील बहुतेक एटीएम सुरक्षारक्षकांअभावी असुरक्षित.अनेक एटीएम सेंटर्समधील सीसीटीव्ही यंत्रणाही बंद असल्याचे निदर्शनास.