शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांच्या ‘शेवटच्या नमस्कारा’ने पोलीस दलात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 3:41 PM

Police Sucide Kolhapur : विमानतळाच्या सुरक्षेत असलेल्या पोलीस निरीक्षक प्रदीप काळे (रा. एनसीसी भवन मागे कोल्हापूर) यांनी ‘आदरणीय सर्वांना नमस्कार आणि जयहिंद. आज मी अनंताच्या प्रवासाला निघालोय’, असा संदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या व्हॉटस्ॲप ग्रुपवर बुधवारी सकाळी पोस्ट केला. या संदेशाने पोलीस दलाची खळबळ उडाली.

ठळक मुद्देपोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांच्या ‘शेवटच्या नमस्कारा’ने पोलीस दलात खळबळवारणा नदीच्या पुलाजवळ सापडले : आत्महत्येचा प्रयत्न नाही

कोल्हापूर : विमानतळाच्या सुरक्षेत असलेल्या पोलीस निरीक्षक प्रदीप काळे (रा. एनसीसी भवन मागे कोल्हापूर) यांनी ‘आदरणीय सर्वांना नमस्कार आणि जयहिंद. आज मी अनंताच्या प्रवासाला निघालोय’, असा संदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या व्हॉटस्ॲप ग्रुपवर बुधवारी सकाळी पोस्ट केला. या संदेशाने पोलीस दलाची खळबळ उडाली.पोलीस दलाने तातडीने शोध घेवून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. दरम्यान, पोलीस निरीक्षक काळे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला नाही. वारणा नदीच्या पूलाजवळ नशेत बेशुध्दअवस्थेत ते सापडले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पेठवडगांव पोलीस ठाण्यातील कार्यकाळातील कसूरीचा अहवाल आणि पोलीस महासंचालकपदासाठी शिफारस वरिष्ठांनी केली नसल्याच्या नैराश्येतून पोलीस निरीक्षक काळे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे संदेश सोशल मिडियावर व्हायरल झाले. त्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी खुलासा केला. काळे यांनी बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास कोल्हापूर परिक्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या व्हॉटस्ॲप ग्रुप एक संदेश पोस्ट केला.

६ वाजून २० मिनिटांच्या सुमारास हा संदेश मी पाहिला. तातडीने अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार केली. त्यातील एक पथक काळे यांच्या घरी पाठविले. तेथे काळे हे तपासासाठी जात असल्याचे सांगून मंगळवारी रात्री दीड वाजता घरातून बाहेर पडले असल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले.

त्यांच्याकडून काळे यांचा दुसरा मोबाईल नंबर घेवून पोलीसांनी त्यांचे लोकेशन शोधले. त्यानुसार पोलीस हे किणी टोलनाक्याजवळील वारणा नदीच्या पूलाजवळील पायवाटेवर नशेमध्ये बेशुध्दअवस्थेत सापडले. त्यांना कसबा बावडा येथील सेवा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथून पुढे खासगी रूग्णालयात नेण्यात आले त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले.

काळे यांच्या संदेशाबाबत पोलीस अधिक्षकांची माहिती

काळे हे पेठवडगांव पोलीस ठाण्यात ऑगस्ट २०१८ ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत कार्यरत होते. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची नियंत्रण कक्षामध्ये बदली करण्यात आली. त्यांच्या जागी पेठवडगाव येथे प्रशिक्षणार्थी पोलीस अधिक्षक धीरजकुमार यांना पदभार देण्यात आला. काळे यांच्या कार्यकाळातील गंभीर स्वरूपाचे सहा गुन्हे प्रलंबित होते.

या गुन्ह्याचे दोषारोपत्र त्यांनी सादर केले नव्हते. त्याबाबत लेखी विचारणा केली होती. त्यांना म्हणणे सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. त्यावर अप्पर पोलीस अधीक्षकांनी काळे यांच्याबाबतचा कसूरी अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविला होता. त्याबाबत आणि पोलीस महासंचालकपदासाठी शिफारस केली नसल्यावरून काळे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांबाबत या संदेशात नाराजी व्यक्त केली. मात्र, त्यांनी याची मला माहिती दिली नाही. कसूरी अहवाल असल्यास पोलीस महासंचालकपदासाठी शिफारस करता येत नसल्याचे बलकवडे यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर