कोल्हापुरात मंगळवारपासून ‘अस्मिता’ चषक फुटबॉल

By Admin | Updated: December 19, 2014 00:52 IST2014-12-19T00:50:55+5:302014-12-19T00:52:41+5:30

स्पर्धेतील विजेत्या संघास ३० हजार व उपविजेत्या संघास २० हजार आणि उपांत्य फेरीतील पराभूत संघांना प्रत्येकी साडेसात हजार व उत्कृष्ट मालिकावीर, बेस्ट फॉरवर्ड, बेस्ट हाफ, बेस्ट डिफेन्स, बेस्ट गोलकीपर

'Asmita' Football Football from Kolhapur on Tuesday | कोल्हापुरात मंगळवारपासून ‘अस्मिता’ चषक फुटबॉल

कोल्हापुरात मंगळवारपासून ‘अस्मिता’ चषक फुटबॉल

कोल्हापूर : अस्मिता चषक फुटबॉल स्पर्धेस मंगळवार(दि. २३) पासून शाहू स्टेडियम येथे प्रारंभ होत असून, स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय माजी फुटबॉलपटू प्रभाकर मगदूम व बाळ ऊर्फ श्रीकांत जाधव यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबीयांकडे स्मृतिचिन्ह व २५ हजारांची ठेव पावती देण्यात येणार असल्याची माहिती स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष अरुण नरके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापुरातील फुटबॉल खेळणाऱ्या तालीम संस्था व फुटबॉल प्रेमी यांना एकत्र आणून ऐक्य घडवून आणण्यासाठी, ज्येष्ठ फुटबॉल खेळाडूंना व त्यांच्या कुटुंबीयांना अर्थिक सहकार्य मिळवून देण्यासाठी अस्मिता चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन गेली तीन वर्षे केले जात आहे. गेल्या तीन वर्षांत या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय फुटबॉलपटू जनार्दन सूर्यवंशी, जयवंतराव सरनाईक, निशिकांत मंडलिक, हांजप्पा औरसंगे, सुंदरसिंह रजपूत, रमजान शेख, पांडुरंग पोफले यांना गौरविण्यात आले आहे. यंदा राष्ट्रीय फुटबॉल पंच व बालगोपालचे माजी फुटबॉलपटू स्वर्गीय प्रभाकर मगदूम व शिवाजी तरुण मंडळाचे माजी फुटबॉलपटू स्वर्गीय बाळ ऊर्फ श्रीकांत जाधव यांचा गौरव करण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघास ३० हजार व उपविजेत्या संघास २० हजार आणि उपांत्य फेरीतील पराभूत संघांना प्रत्येकी साडेसात हजार व उत्कृष्ट मालिकावीर, बेस्ट फॉरवर्ड, बेस्ट हाफ, बेस्ट डिफेन्स, बेस्ट गोलकीपर यांनाही प्रत्येकी तीन हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
यावेळी बाळासाहेब निचिते, संभाजी पाटील-मांगोरे, श्रीनिवास जाधव, पप्पू नलवडे, राजू चौगुले, सतीश सूर्यवंशी उपस्थित होते.

Web Title: 'Asmita' Football Football from Kolhapur on Tuesday