शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडर देणाऱ्यास विचारा, लस घेतली का? शहरात केवळ ४५ जणांचेच लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST

कोल्हापूर : कोरोना काळात हाॅटेलसह रेस्टाॅरंट बंद असले तरी शहरात गॅस सिलिंडरची डिलिव्हरी सुरू आहे. त्यामुळे ही डिलिव्हरी देणाऱ्या ...

कोल्हापूर : कोरोना काळात हाॅटेलसह रेस्टाॅरंट बंद असले तरी शहरात गॅस सिलिंडरची डिलिव्हरी सुरू आहे. त्यामुळे ही डिलिव्हरी देणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग प्रतिबंधक लस न मिळाल्यामुळे सातत्याने जीव मुठीत घेऊन प्रत्येक ग्राहकाच्या दारात जावे लागत आहे. आतापर्यंत शहरातील २३ वितरकांकडील ३०० हून अधिक कर्मचाऱ्यांपैकी ४५ वर्षांवरील ४५ जणांचे पहिल्या टप्प्यातील लसीकरण पूर्ण झाले आहे. ही मंडळी आता दुसऱ्या लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत, तर उर्वरित २५५ जणांना अजूनही पहिली लस मिळालेली नाही.

राज्य शासनाने अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना प्राधान्याने कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक लस देण्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यातून केवळ आरोग्य, पोलीस अशा विभागांतील कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस दिला, तर अन्य फ्रंटलाइन वाॅरियर्स म्हणून संबोधलेल्यांना पहिल्या टप्प्यातील लस मिळाली नाही. त्यापैकी थेट ग्राहकांशी संबंध येणाऱ्या डिलिव्हरी बाॅयचाही समावेश आहे. शहरात एकूण २३ गॅस वितरकांकडे सुमारे ३०० जण काम करीत आहेत. त्यापैकी केवळ ४५ जणांनाच ४५ वर्षांवरील नागरिक म्हणून लस मिळाली आहे, तर अन्य डिलिव्हरी बाॅयना राज्य शासनाने नवा नियम काढूनही ती मिळत नाही. यासाठी वितरक कंपन्यांना हे कर्मचारी आहेत असे पत्र देऊनही शासकीय रुग्णालये, महापालिकेच्या लसीकरण आरोग्य केंद्रातून लस मिळत नाही. अनेकांनी ही पत्रे दाखविल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी लस उपलब्ध झाल्यानंतर या, असे सांगितले. त्यामुळे अनेक जण पहिल्या लसीकरणापासून वंचित आहेत.

अकरा डिलिव्हरी बाॅय पाॅझिटिव्ह

शहरातील विविध गॅस वितरकांकडे काम करणाऱ्या डिलिव्हरी बाॅयना ग्राहकांच्या दारात सिलिंडर ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र, अनेक जण घरात आणून ठेवा म्हणून सांगतात. अशावेळी कोरोनाबाधित ग्राहक असेल तर डिलिव्हरी बाॅयचा थेट संपर्क येत आहे. हीच मंडळी वितरकाच्या कार्यालयात अथवा गोडाऊनमध्ये आल्यानंतर त्यांच्याकडूनही संसर्ग फैलावू शकतो. त्यातून अकरा डिलिव्हरी बाॅयना कोरोना संसर्गाची लागण झाली. त्यांची आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर त्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला.

सिलिंडर सॅनिटाइज केले जात नाही

डिलिव्हरी बाॅय ग्राहकांना सिलिंडर सॅनिटाइज करूनच वापरा म्हणून सांगतात. मात्र, ग्राहक ते सॅनिटाइज करून वापरत नाहीत. यासाठी वितरक कंपनी डिलिव्हरी बाॅयना ग्राहकाला सॅनिटाइज करूनच ते वापरा, असे डिलिव्हरी देताना आवर्जून सांगा, अशा सूचना देतात. त्यामुळे डिलिव्हरी बाॅयही ग्राहकांना ते स्वच्छ करूनच वापरा असे सांगतात; पण अनेक ग्राहक ते स्वच्छ करीत नाहीत. थेट रेग्युलेटरला जोडून वापरतात.

डिलिव्हरी बाॅय म्हणतो

जग बंद असले तरी आमची अत्यावश्यक सेवा म्हणून गॅस सिलिंडर डिलिव्हरी देण्याची सेवा सुरूच असते. त्यात कोरोना संसर्गाचा धोका मोठा आहे. आम्हाला फ्रंटलाइन वाॅरियर्स म्हणून प्रथम प्राधान्य देऊन लसीकरण करणे गरजेचे होते; पण ते केले जात नाही. विशेष म्हणजे वितरण कंपनीचे पत्र दाखवूनही शासकीय यंत्रणा दाद देत नाही.

- युवराज घोटणे, डिलिव्हरी बाॅय

प्रतिक्रिया

सिलिंडरची डिलिव्हरी देताना बाॅयचा थेट ग्राहकांशी संबंध येतो. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका या डिलिव्हरी बाॅयना अधिक आहे. स्प्रेडर म्हणून त्यांच्याशी संपर्क आल्यानंतर अनेकांना संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे शासनाने प्राधान्यक्रमाने डिलिव्हरी बाॅयना पहिले व दुसरे लसीकरण तत्काळ करावे.

- शेखर घोटणे, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा गॅस वितरक संघटना

कोट

लस उपलब्ध झाल्यानंतर गॅस वितरक कंपन्यांकडे सिलिंडर डिलिव्हरीसाठी असलेल्या कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण केले जाईल.

अशी आहे आकडेवारी

दत्तात्रय कवितके, जिल्हा पुरवठा अधिकारी,

शहरातील एकूण घरगुती गॅस ग्राहक - ३ लाख २५ हजार

शहरातील गॅस वितरित करणाऱ्या एजन्सींची संख्या - २३

घरपोच डिलिव्हरीसाठी असलेले कर्मचारी -३००

किती कर्मचाऱ्यांनी घेतला पहिला डोस - ४५

किती कर्मचाऱ्यांनी घेतला दुसरा डोस- ०

एकही डोस न घेणारे कर्मचारी - २५५