अशोक पाटोळे यांची मातंग समाज संघटनेच्या अध्यक्षपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:44 IST2021-03-13T04:44:44+5:302021-03-13T04:44:44+5:30

राधानगरी तालुका मातंग समाज संघटित करून येणाऱ्या काळातील समस्यांना तोंड देण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले. तालुक्यातील २२-२३ गावांत असणारा मातंग ...

Ashok Patole elected as President of Matang Samaj Sanghatana | अशोक पाटोळे यांची मातंग समाज संघटनेच्या अध्यक्षपदी निवड

अशोक पाटोळे यांची मातंग समाज संघटनेच्या अध्यक्षपदी निवड

राधानगरी तालुका मातंग समाज संघटित करून येणाऱ्या काळातील समस्यांना तोंड देण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले. तालुक्यातील २२-२३ गावांत असणारा मातंग समाज असे विविध ठराव करण्यात आले. यावेळी संघटनेची कार्यकारिणी निवडण्यात आली.

अध्यक्ष अशोक पाटोळे (कौलव), उपाध्यक्ष संजय सूर्यवंशी (शिरगाव), उपाध्यक्ष संभाज़ी पाटोळे (अर्जुनवाडा). सचिव सागर पाटोळे (येळवडे) .नागेश शेंडगे (पा. सावर्डे), दत्ता पाटोळे (चांदे), दिलीप चौगले, सुंदर चांदणे, अतुल चौगले, ज्ञानदेव शेंडगे, अनिल मांग, अर्जुन भोरे, गणेश खुडे, अभिषेक चौगले, अशोक साठे, भाऊसाो चांदणे, बबन पाटोळे, ज्ञानदेव चांदणे, गणपती पाटोळे, कृष्णात शेंडगे, ज्ञानेश पाटोळे यांची एकमताने निवड करण्यात आली.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून सभेला सुरूवात झाली. प्राचार्य अशोक पाटोळे यांनी स्वागत केले. ज्ञानेश पाटोळे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल फकिरा सेनेचे कार्याध्यक्ष संजय सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सागर पाटोळे यांनी आभार मानले.

फोटो १२ अशोक पाटोळे -अध्यक्ष १२. सागर पाटोळे सचिव

Web Title: Ashok Patole elected as President of Matang Samaj Sanghatana