शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
4
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
5
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
7
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
8
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
9
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
10
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
11
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
12
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
13
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
14
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
15
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
16
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
17
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
18
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
19
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
20
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स

‘आशा’दायी नेत्रदीपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 11:59 IST

स्त्रीरोग तज्ज्ञ होण्याचे स्वप्न उराशी बाळगून वाटचाल करणाऱ्या नेत्रदीपाचे वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी पितृछत्र हरपले आणी गळ्यात स्टेटसकोपच्या जागी वरमाळ पडली. गोव्यात जन्मलेली, लाडाकोडात वाढलेली नेत्रदीपा लग्नानंतर एकदम अबोल, हतबल, घरसंसाराच्या गाड्यात स्वत:ला जुंपलेली स्त्री बनली.

नसीम सनदी, कोल्हापूर.

स्त्रीरोग तज्ज्ञ होण्याचे स्वप्न उराशी बाळगून वाटचाल करणाऱ्या नेत्रदीपाचे वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी पितृछत्र हरपले आणी गळ्यात स्टेटसकोपच्या जागी वरमाळ पडली. गोव्यात जन्मलेली, लाडाकोडात वाढलेली नेत्रदीपा लग्नानंतर एकदम अबोल, हतबल, घरसंसाराच्या गाड्यात स्वत:ला जुंपलेली स्त्री बनली. पण त्यातूनही तिने जिद्दीने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. आईच्या प्रेरणेने ‘आशा स्वयंसेविका’ म्हणून कामास सुरुवात करून नव्या वाटचालीला सुरुवात केली.

संघटना बांधली, जिल्हा, राज्यस्तरावर पदे भूषवून, दिल्लीत आवाज उठवला, एवढेच नव्हे तर ‘युनो’त देशाचे प्रतिनिधीत्व केले. ही अविश्वसनीय झेप घेताना आयुष्यात आलेल्या एका प्रसंगाने मात्र ती कोलमडली. आत्महत्येच्या विचारापर्यंत गेली पण मैत्रिणीच्या पाठबळावर ती पुन्हा हिंमतीने उभी राहिली. ज्या संघटनेतून हाकलण्याची भाषा झाली त्याच संघटनेची नव्याने बांधणी करून राज्यात कुठेच नाही अशी फक्त महिलांचीच कार्यकारिणी असलेली संघटना बांधली आणि अन्यायाच्या विरोधात पेटून उठण्याचा आदर्श घालून देत नव्या पर्वात दाखल झाली रणरागिणी बनूनच.

जिद्द, सचोटी संघर्षाची चित्रपट कथानकाप्रमाणे वाटचाल असलेल्या आशा कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष नेत्रदीपा पाटील यांनी आयुष्यात काटेरी मार्गावरून चालण्याची सवय लावूनच घेतली आहे. मात्र, हे करताना चेहºयावर दु:खाचा लवलेशही न दाखवता आजूबाजूच्या महिलांना आधार देणाºया नेत्रदीपा म्हणूनच आजच्या काळातील दुर्गा ठरल्या आहेत.

या दुर्गेत रंजल्या गांजलेल्यांसाठी कणव आहे, दुर्बलांसाठी मदतीचा हात देण्याची प्रवृत्ती आहे, अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची आणि उठवण्याची ऊर्मी आहे. स्वत:च्या आयुष्यातील संघर्ष, अडीअडचणी सोडवतानाच वंचितांसाठी धावून जाण्याची प्रवृत्ती ही आहे; पण ही दुर्गा एका दिवसात घडलेली नाही. त्यासाठी आयुष्याची बरीच वर्षे घालवावी लागली.

त्यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातील उपळावी. वडील चंद्रकांत जाधव हे इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असल्याने नोकरीनिमित्त गोव्यात स्थायिक. गोव्यातीलच सांगेगोवाजवळील नेत्रावळी या गावात नेत्रदीपा यांचा जन्म झाला. शाळेत स्कॉलर विद्यार्थिनी, प्रत्येक उपक्रमांत हिरीरीने सहभाग नोंदवणारी म्हणूनच ओळख.

गुणवत्तेची शिखरे खुणावत असतानाच वयाच्या १२ व्या वर्षी वडिलांचे निधन झाले आणि सर्व कुटुंब जत तालुक्यातील उमदी या मामाच्या गावी स्थायिक झाले. येथे पीठाची गिरण चालवत आईने मुलांचे पालनपोषण सुरू ठेवले. तेथेच शिरोळ येथील आत्तेभावाशी नेत्रदीपा यांचे वयाच्या १२ व्या वर्षीच लग्न ठरविण्यात आले, शिकण्याची इच्छा व्यक्त केल्याने दहावीनंतर लग्न झाले. नवºयाच्या परवानगीने पुढे ११ वी, १२ वी आणि एम.ए. पर्यंतचे शिक्षण घेतले व सामाजिक कार्यात वाहून घेतले. आशा कर्मचाºयांची भक्कम संघटना उभी केली.

मात्र, यशाची कमान चढत असताना संघटनेतील अंतर्गत मतभेदावरून शारीरिक आणि मानसिक संघर्षाचा सामना करावा लागला. या प्रसंगाने नेत्रदीपा पुरत्या कोलमडून गेल्या. आत्महत्या करण्याचेही विचार डोक्यात आले पण आईचे संस्कार, संघटनेतील महिला, मैत्रिणी अर्चना आणि माया यांनी वाढवलेल्या आत्मविश्वासाच्या बळावर नेत्रदीपा पुन्हा एकदा तळपण्यासाठी सज्ज झाल्या. आपली भूमिका ठामपणे मांडत त्यांनी संघटनेची नव्याने बांधणी सुरू केली. आशा या महिलाच असल्याने यात पुरुषांची लूडबूड कशासाठी, असे ठणकावून सांगत महिलांचीच कार्यकारिणी असलेली संघटना उभारली.

देशाचे प्रतिनिधीत्व केल्याचा अभिमानआशा कर्मचाऱ्यांना मानधन, भत्ते, ड्रेस यासाठी आग्रह धरला. मुख्य सचिवांपर्यंत व्यथा मांडल्या. राज्यभरातील २२ हून अधिक जिल्ह्यात फिरून आशांचे संघटन केले. ‘डब्ल्यूएचओ’ संघटनेत जगभरातील १७५ देशांच्या प्रतिनिधींसमोर भारताची प्रतिनिधी म्हणून सादरीकरण केले.

                                                                    

 

टॅग्स :Navratriनवरात्रीkolhapurकोल्हापूर