Kolhapur: भाजपमध्ये प्रवेश करताच स्वाती कोरी यांनी मंत्री मुश्रीफांवर आरोप केला; चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटलांना टोला लगावला, म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 16:10 IST2026-01-27T15:43:04+5:302026-01-27T16:10:37+5:30

गडहिंग्लजला माजी नगराध्यक्षा कोरींसह जनता दल कार्यकर्त्यांचा भाजपप्रवेश

As soon as she joined the BJP Swati Kori accused Minister Hasan Mushrif; Chandrakant Patil took a dig at Satej Patil | Kolhapur: भाजपमध्ये प्रवेश करताच स्वाती कोरी यांनी मंत्री मुश्रीफांवर आरोप केला; चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटलांना टोला लगावला, म्हणाले..

Kolhapur: भाजपमध्ये प्रवेश करताच स्वाती कोरी यांनी मंत्री मुश्रीफांवर आरोप केला; चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटलांना टोला लगावला, म्हणाले..

गडहिंग्लज : विधान परिषदेला नगरसेवकांची २०-२२ मते असणाऱ्या जिल्ह्यातील तीन ठिकाणी सतेज पाटील यांना पाठिंबा मिळाला. त्यामुळेच अमल महाडिक यांनी निवडणुकीतून माघार घेतली. तीनपैकी स्वातीताई आमच्यात आल्या आहेत. आता ‘पेठवडगावच्या ताईंचं’ही बघा, अशी सूचना खासदार महाडिक यांना करत ‘स्वातीताई, गेल्या विधानपरिषद निवडणुकीवेळीच आमच्यासोबत आल्या असत्या, तर आता उड्या मारणारे सतेज पाटील आमदारच राहिले नसते,’ असा टोला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

जनता दलाचे माजी आमदार ॲड. श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या माजी नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी, शहराध्यक्ष काशीनाथ देवगोंडा, माजी उपनगराध्यक्ष महेश कोरी यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते.

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, श्रीपतराव शिंदेंनी केवळ जनतेच्या प्रेमावर साम्राज्य निर्माण केले. गोरगरिबांना न्याय देण्यासाठी प्रस्थापितांविरुद्ध संघर्ष केला. आमदार शिवाजीराव पाटील म्हणाले, ‘आम्ही कुणाच्यात भांडण लावत नाही. कुणाचे घर उद्ध्वस्त करत नाही.’ यावेळी माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, बाळासाहेब मोरे, महेश जाधव, राहुल चिक्कोडे, आदी उपस्थित होते.

शिवाभाऊंना थेट प्रवेश

आमदार शिवाजीराव पाटील हे मुख्यमंत्र्यांचे लाडके आमदार आहेत. त्यांना देवाभाऊंकडे थेट प्रवेश असल्यामुळे स्वातीताईंनी चिंता करण्याचे कारण नाही. काहीवेळा मलाही शिवाजीरावांच्या मदतीनेच देवाभाऊंकडे जावे लागते, असा चिमटा मंत्री पाटील यांनी काढला.

मुश्रीफांच्या दडपशाहीमुळेच भाजपमध्ये

मुश्रीफांनी मला व जनता दलाला राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या दडपशाहीमुळे कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यामुळेच कोणत्याही अपेक्षेशिवाय विनाअट भाजपमध्ये प्रवेश केला आहे, असे स्वाती कोरी यांनी स्पष्ट केले.

Web Title : स्वाती कोरी बीजेपी में शामिल, मंत्री मुश्रीफ पर आरोप; पाटिल का तंज।

Web Summary : स्वाती कोरी ने बीजेपी में शामिल होकर मंत्री मुश्रीफ पर दमन का आरोप लगाया। पाटिल ने सतेज पाटिल की आलोचना करते हुए कहा कि कोरी के पहले समर्थन से चुनाव परिणाम बदल सकते थे। कोरी ने मुश्रीफ द्वारा उन्हें और जनता दल को खत्म करने के प्रयासों को बीजेपी में शामिल होने का कारण बताया।

Web Title : Swati Kori joins BJP, accuses Minister Mushrif; Patil taunts Satej.

Web Summary : Swati Kori joined BJP, accusing Minister Mushrif of suppression. Patil criticized Satej Patil, suggesting Kori's earlier support could have changed election results. Kori cited Mushrif's attempts to politically eliminate her and Janata Dal as the reason for joining BJP.