शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

हिजाबवरुन विद्यार्थी अन् शिक्षकामध्ये वाद, कोल्हापुरातील एका महाविद्यालयातील घटना; तणावाचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 16:27 IST

वर्ग सुरु असताना त्याचे शिकवण्याकडे लक्ष नसल्याचे निदर्शनास येताच शिक्षकाने संबंधित विद्यार्थ्याला हटकले

कोल्हापूर : शहरातील एका महाविद्यालयातील वर्गात बसलेला विद्यार्थी गोंधळ घालू लागल्याने शिक्षकाने संबंधित विद्यार्थ्याला गोंधळाचा जाब विचारत त्याच्या गळ्यातील गमछा काढण्यास सांगितले. मात्र, त्याने वर्गातील मुलीचा हिजाब काढा मगच मी गमछा काढतो असे उत्तर दिल्याने तणाव निर्माण झाला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणानंतर हिंदुत्ववादी संघटनांनीही संबधित महाविद्यालयात जात प्रशासनाकडून माहिती घेतली.शहरातील एका महाविद्यालयातील बी.काॅमच्या पहिल्या वर्षात संबंधित विद्यार्थी शिक्षण घेत आहे. सोमवारी तो पहिल्यांदाच कॉलेजमध्ये आला होता. वर्ग सुरु असताना त्याचे शिकवण्याकडे लक्ष नसल्याचे निदर्शनास येताच शिक्षकाने त्याला हटकले. त्याच्या गळ्यातील गमछा काढण्यास सांगितले. मात्र, त्याने याला विरोध केला. वर्गातील मुलींने घातलेला हिजाब काढा, मगच गमछा काढतो अशी भूमिका घेतली. यावरून काही विद्यार्थी व शिक्षकामध्ये वाद झाला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी महाविद्यालयात धाव घेतली. त्यांनी संबंधित शिक्षकांने माफी मागण्याची मागणी केली. दरम्यान, सर्व जाती-धर्मांना सामावून घेणारे आमचे महाविद्यालय आहे. त्यामुळे कोणत्याही विशिष्ठ जातीच्या-धर्माच्या विद्यार्थ्यांना टार्गेट करण्यात येत नसल्याचे संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यानी सांगतले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHindutvaहिंदुत्वcollegeमहाविद्यालयTeacherशिक्षकStudentविद्यार्थी