शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कागल तालुक्यात आधार कार्डसाठी मनमानी

By admin | Updated: February 19, 2015 23:37 IST

तीनच केंदे्र : एका केंद्रावर मनमानी पद्धतीने लोकांच्याकडून पैसे

जहाँगीर शेख - कागल -रेशनकार्डावरील धान्याच्या बदल्यात रोख स्वरूपात बँकेत अनुदान जमा होणार आहे. त्यासाठी आधार कार्ड हवे, असे रेशन धान्य दुकानदारांनी सांगितल्यापासून कागल तालुक्यात आधार कार्डापासून वंचित असलेल्या लोकांची धांदल उडाली आहे; पण आधार कार्ड काढून देणारी तीनच केंद्रे कागल तालुक्यात असल्याने तेथे गर्दी होत आहे. त्यातच एका केंद्रावर मनमानी पद्धतीने लोकांच्याकडून पैसे घेतले जात आहेत. तहसील कार्यालयाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. कागल तालुक्यातील नोकरी, कामधंदा यानिमित्त बाहेरगावी राहिलेले लोक तसेच गोरगरीब, शेतमजूर, अशिक्षित लोकांचा बँकेच्या व्यवहाराशी फारसा संपर्क आला नसल्याने त्यांना आधार कार्डाचीही गरज भासली नव्हती. मात्र, आता रेशन धान्य दुकानदाराने धान्य देण्याचे बंद करून आधार कार्ड हजर करा, असे म्हटल्यावर कामधंदा सोडून हे लोक आधार कार्ड काढण्यासाठी महा-ई-सेवा केंद्रावर सहकुंटुब हजर होत आहेत. तालुक्यात मुरगूड, चिखली, कागल येथील तीन महा-ई-सेवा केंद्रांवर ही सुविधा सुरू आहे. दिवसभर येथे गर्दी होत आहे. याचाच फायदा घेत एका केंद्रावर मनमानी पद्धतीने पैसे घेतले जात आहेत. तालुक्यात तीनच ठिकाणी ही केंद्रे आणि ती पण एकमेकांपासून दूर अंतरावर असल्याने लोक हतबल झाले आहेत. यापूर्वीही या एका महा-ई-केंद्राबद्दल तहसील कार्यालयाकडे तक्रारी झाल्या आहेत. आधार कार्ड आणि तहसील कार्यालयाचा फारसा संबंध नाही. मात्र, महा-ई-सेवा केंद्रे या कार्यालयाच्याच नियंत्रणाखाली काम करतात.महा-ई-सेवा केंद्रांनाही अनुदान नाहीवर्षभरापूर्वी आधार कार्ड काढून देण्यासाठी सेवा केंद्रांची नियुक्ती झाली. एका आधार कार्डामागे दहा रुपयांच्या दरम्यान खर्चापोटी अनुदान घेऊन हे काम ही केंद्रे करीत आहेत. मात्र, एक-दोन केंद्रांच्या अशा वागणुकीमुळे सर्वांनाच त्रास होत आहे.